Asha Parekh: आशा पारेख आज 82 वर्षांच्या आहेत मात्र अजूनही त्यांचा अभिनय आणि सौंदर्याचे चाहते आहेत. त्यांनी त्याच्या कार्यकाळात राजेश खन्ना आणि धर्मेंद यांच्यासारखा सुपरस्टारसोबत काम केलं आहे. आशा पारेश यांचे फिल्मी करिअर हिट असले तरी त्यांचे खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले. याच कारणामुळं त्यांचे लग्न होऊ शकले नाही. आशा पारेख ज्यांना काका बोलायच्या त्यांच्याशीच त्यांचे नाव जोडले गेले. आशा पारेख यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
तिसरी मंजिल, दिल देके देखोसह आशा आणि शशि कपूर यांच्यासह चित्रपटात काम केले होते. मोठ्या पडद्यावर ही जोडी खूप फेमस होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या अफवा रंगल्या होत्या. ज्यामुळं त्यांच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले. आशा पारेख यांनी अभिनेते आणि निर्माता अरबाज खान याच्या कार्यक्रमात खुलासा केला होता की, लग्नाच्या अफवा का रंगल्या होत्या. त्या म्हणाल्या की, महाबळेश्वरमध्ये शूटिंग चालली होती. ओम प्रकाश यांच्या मनात काय चाललं होतं हे मला माहिती नाही. त्यांनी घोषणा केली की, माझी आणि शमी कपूर यांचं लग्न झालं आहे. त्यानंतर नासिर हुसैन यांच्या घरी पार्टी होती. तिथेही या अफवा खूप चर्चिला गेल्या. मग मीदेखील हो आमचं लग्न झालं होतं म्हटलं तेव्हा त्यापार्टीत एक पत्रकारदेखील होते, असं आशा पारेख यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्रीने शम्मी कपूर यांचा उल्लेख करत पुढे म्हटलं होती की, महिला पत्रकाराला आम्ही सांगितले की आम्ही मस्करी करतोय. कोणाला काही सांगू नको. आशा यांनी पुढेही सांगितलं की, मी शम्मी कपूर यांच्या चेहऱ्यावर कधीच दुःख पाहिलं नाही. फक्त 1965 मध्ये त्यांना दुखी झालेलं पाहिलं होतं. जेव्हा त्यांच्या पत्नीचे गीता बाली यांचं निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर 4 वर्षानंतर त्यांनी 1969 मध्ये नीला देवी यांच्याशी लग्न केले होते. आशा पारेख शम्मी कपूर यांना काका म्हणून हाक मारायच्या. कारण शम्मी आणि त्यांच्या पत्नीने आशा पारेख यांना दत्तक घेण्याबद्दल बोलून दाखवले होते. त्यामुळं त्या त्यांना काका हाक मारायच्या.
आशा पारेख नासिर हुसेनवर खूप प्रेम करत होत्या, पण आशा पारेख कधीही हुसेनशी लग्न करू इच्छित नव्हत्या. त्यांना 'घर तोडणारी' आणि हुसेनच्या मुलांना 'दुखी' नव्हते करायचे.. एका मुलाखतीत त्या म्हणाला, "अविवाहित राहणे हा कदाचित मी घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. नासिर हुसैन हे अमिर खानचे काका होते.