Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ते स्वत:ला माझे मालक समजायचे,' मुमताज यांनी राजेश खन्नांसोबतचा भूतकाळ केला उघड, 'दुसऱ्या हिरोसह दिसले की...'

1970, 1980 च्या दशकात राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि मुमताज (Mumtaz) यांची जोडी सुपरहिट होती. मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. मी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्यांसह काम करायचे तेव्हा राजेश खन्ना नाराज होत असत असा खुलासा त्यांनी केला.   

'ते स्वत:ला माझे मालक समजायचे,' मुमताज यांनी राजेश खन्नांसोबतचा भूतकाळ केला उघड, 'दुसऱ्या हिरोसह दिसले की...'

1960 आणि 1970 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये मुमताज (Mumtaz) यांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. मोठ्या पडद्यावर राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना सर्वाधिक आवडली. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दरम्यान पडद्यावर जबरदस्त केमिस्ट्री असणाऱ्या राजेश खन्ना यांच्यासह पडद्यामागे नातं कसं होतं याबद्दल मुमताज यांनी सांगितलं आहे. मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. मी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्यांसह काम करायचे तेव्हा राजेश खन्ना नाराज होत असत असा खुलासा त्यांनी केला. 

 

राजेश खन्ना या गोष्टीवर व्हायचे नाराज

रेडिफला दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी सांगितलं की, "मी जर धर्मेंद्रजी किंवा देव (आनंद) साहब यांच्यासोबत चित्रपट साईन केला तर ते (राजेश खन्ना) नाराज होत असत. पण ते दुसऱ्या अभिनेत्रींसह काम करायचे. त्यावेळी मी कधीच तोंड वाकडं केलं नाही. त्यांना वाटायचं ते माझे मालक आहेत. पण काही हरकत नाही. याचा अर्थ ते माझी चिंता करत असत". यावेळी त्यांनी शर्मिला टागोर यांच्याशी आपली नेहमी तुलना होत असे, पण आमच्यात काहीच वाद नव्हता असंही सांगितलं. 

शर्मिला टागोर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी त्यांचा फार आदर करत असे. त्या माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि समजूतदार होत्या. मी वयाच्या आठव्या वर्षी काम सुरु केलं होतं. त्यामुळे मला सगळं काही शिकण्याची संधी मिळाली. शर्मिला किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली नाही. माझ्यावर देवाची कृपा होती की, काकासह (राजेश खन्ना) माझा एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही. शर्मिला यांच्यासह काम केलेले त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले होते".

पुन्हा एकदा अभिनयात परतणार?

मुलाखतीत मुमताज यांना तुम्ही चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, "मला माझी कथा लिहिण्यासाठी मोठी रक्कम ऑफर झाली आहे. पण जेव्हा मी तयार असेन तेव्हाच मी हे करेन. मी अभिनयात पुनरागनही करेन, पण त्यासाठी काहीतरी लायक असं मिळायला हवं. मी आजकाल तयार होणारे चित्रपट पाहते, पण त्यात माझ्यासाठी काहीच नसतं. मी आई किंवा वहिनीची भूमिका का करु? मी आयुष्यात नेहमी तेच केलं जे मला करायचं होतं". मुमताज यांनी यावेली आपली दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासह काम करण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं. 

मुमताज यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत 'दो रास्ते', 'बंधन', 'सच्चा झूठा', 'दुश्मन', 'रोटी' आणि 'आप की कसम'सह अनेक हिट चित्रपट दिले. तसंच शर्मिला टागोर यांनी राजेश खन्नांसोबत 'आराधना', 'सफर', 'अमर प्रेम', 'छोटी बहू' आणि 'नसीब' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Read More