Marathi News> मनोरंजन
Advertisement

शबाना आझमी कार अपघातात गंभीर जखमी

रुग्णालयात दाखल.... 

शबाना आझमी कार अपघातात गंभीर जखमी

रायगड : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला शनिवारी अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्या असून त्यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर सावरोली टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झाला अपघात झाला होता. अपघातानंतर काही तासांनीच आझमी यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आणण्यात आलं. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

कारची ट्रकला मागून धडक लागून हा अपघात झाल्याचं कळत आहे. दरम्यान, कारमध्ये आझमी यांचे पती, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे देखील होते. त्यांना मात्र  कोणतीही इजा झालेली नाही. शुक्रवारीच जावेद अख्तर यांचा ७५वा वाढदिवस होता. 

fallbacks

दरम्यान, सोशल मीडियावर आझमी यांच्या अपघातग्रस्त कारचे फोटो व्हायरल झाले. यामध्ये आझमी यांना गंभीर दुखापत झाल्याचं कळत आहे. तर, त्यांच्या कारच्या पुढच्या भागाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

Read More