Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकी-कतरिनाचं मित्रांसाठी खास पत्र, दिलं महत्त्वाचं वचन

नुकताचं लग्न बेडीत अडकलेल्या विकी-कतरिनाने मित्रांसाठी लिहिलेलं खास पत्र समोर  

विकी-कतरिनाचं मित्रांसाठी खास पत्र, दिलं महत्त्वाचं वचन

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं. लग्नात कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या काही जवळच्या लोकांनी हजेरी लावली. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे कतरिना आणि विकीने आपल्या सर्व बॉलीवूड मित्रांना लग्नासाठी आमंत्रित केले नाही.

मित्रांना आमंत्रित करता आलं नसल्यामुळे दोघांनी लग्नाआधी त्यांच्या खास मित्रांना एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र आता समोर आलं आहे. या पत्रानंतर आता दोघेही मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय लिहिलं आहे पत्रात
'9 डिसेंबर रोजी, देवाच्या कृपेने आणि आमच्या पालकांच्या आशीर्वादाने, आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं पाऊल उचललं आणि लग्नाचा निर्णय घेतला. आमची इच्छा असूनही, सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही अनेकांना आमंत्रिक करू शकलो नाही. पण हा आनंद लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'

fallbacks

कतरिना आणि विकीने पत्रासह पाठवलेल्या हॅम्पर्समध्ये मोतीचूरचे लाडू, परफ्यूम, मेणबत्त्या, फुले अशा सुंदर वस्तू होत्या. यासोबतच त्याने थँक्स नोटही लिहिली, ज्यामध्ये दोघांनीही आपल्या मित्रांना लवकरच भेटण्याचे वचन दिलं आहे. या पत्रावर 'शुक्र रब दा शुक्र सब दा' असं देखील लिहिलं आहे.

Read More