Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकी कौशलचा 'छावा' आता घरी बसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Chhaava OTT Release : ओटीटीवर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित...

विकी कौशलचा 'छावा' आता घरी बसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Chhaava Movie OTT Release : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट कधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याची सगळेच प्रतीक्षा करत होते. आता आज 11 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियानं काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. तर छावा गेल्या 56 दिवसांपासून थिएटरमध्ये यशस्वीपणे कमाई करत होता. आता हा चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. 

कमाईचा आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, 56व्या दिवशी म्हणजेच OTT रिलीजच्या आदल्या दिवशी, 'छावा'ने भारतात 30 लाखांची कमाई केली. आतापर्यंत भारतात एकूण नेट कलेक्शन 599.85 कोटींचं झालं आहे, तर वर्ल्डवाइड कमाई 805.25 कोटींवर पोहोचली आह. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

यामुळेच 'छावा' ही 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरली आहे. मात्र, अलीकडे सलमान खानचा 'सिकंदर' आणि सनी देओलचा 'जाट' हे चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे कमाईवर थोडा परिणाम झाला होता. 

या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे की कशा प्रकारे त्यांनी आयुष्य जगलं आणि स्वराज्यासाठी लढले. ज्या प्रकारे इतिहास हा सगळ्यांना दाखवण्यात आला आहे त्याचं कौतूक करण्यात आलं. आता छावा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानं सगळ्यांना हा पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 

चित्रपटातील स्टारकास्टविषयी बोलायचं झालं तर विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना,  आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या कलाकारांनी या चित्रपटात केलेल्या अभिनयाची सगळीकडून कौतूक करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे तर आणि निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये एंट्री घेतली होती.

Read More