Vicky Kaushal Mumbai House Rent: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं त्याच्या मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या अपार्टमेंटचं भाडेतत्वावरचं कॉन्ट्रॅक्ट हे रिन्यू करणार आहे. याचा अर्थ हा आहे की तो पुढच्या तीन वर्षांसाठी त्याच घरात राहणार आहे. तर विकी कौशल या घरासाठी दर महिन्याला 17.01 लाख रुपये भाडं देणार असल्याचं म्हटलं जातं आहे. तर या डीलच्या अंतर्गत विकी हा कोटी रुपये खर्च करणार आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या या भाडेत्त्वावर असलेल्या घराचं संपूर्ण गणित काय असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलनं जुहूच्या लग्झरी प्रोजेक्ट 'राज महल' मध्ये हे अपार्टमेंट घेतलं आहे. हे अपार्टमेंट 258.48 स्क्वेअर मीटरच्या कार्पेट एरियाचं आहे आणि त्यासोबत तीन कार पार्किंगची सुविधा आहे. भाडेत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टनुसार, एप्रिल 2025 मध्ये रजिस्टर्ड करण्यात आली आहे. डीलनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी विकी दरमहिन्याला 17.01 लाख रुपये भाडं देणार आहे. तिसऱ्या वर्षी हे भाडं 17.86 लाख दरमहा होणार आहे. एकूण बोलायचं झालं तर तीन वर्षात विकी हा 6.2 कोटी रुपये भाडं देणार आहे.
या डीलच्या अंतर्गत विकीनं 1.69 लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आणि 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस देखील देणार आहे. त्याशिवाय तिनं 1.75 कोटी रुपये सिक्योरिटी डिपॉजिट म्हणून जमा करणार आहे. तर या आधी जुलै 2021 मध्ये विकीनं या अपार्टमेंटसाठी पाच वर्षाचं लीज साइन केलं होतं. तेव्हा त्याचं भाडं हे 8 लाख रुपये दरमहिना होतं.
हेही वाचा : श्रीलीलाच्या घरी आली लक्ष्मी; फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्या हृदयात...'
दरम्यान, वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'छावा' या चित्रपटानं धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटानं प्रदर्शनाच्या जवळपास 22 दिवसात 601 कोटींची कमाई केली. त्या चित्रपटात विकीनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह एंड वॉर' मध्ये दिसणार आहे. विकी कौशल यापुढे कोणत्या चित्रपटात दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.