Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vicky Kaushal नं Katrina Kaif ला असं केलं प्रपोज; व्हिडीओ तुफान व्हायरल

'मुझसे शादी करोगी' विचारताच कतरिनानं.... 

Vicky Kaushal नं Katrina Kaif ला असं केलं प्रपोज; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई : अभिनेता Vicky Kaushal आणि अभिनेत्री Katrina Kaif यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि पाहता पाहता या जोडीच्या खासगी आयुष्याबाबत अनेकांनीच कुतूहल व्यक्त करण्यास सुरुवात केली.

मागच्या बऱ्याच काळापासून कतरिना आणि विकी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे, त्यामुळं या जोडीच्या केमिस्ट्रीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. सूत्रांच्या माहितीनुसार विकी आणि कतरिनानं त्यांच्या नात्याची अधिकृत ग्वाही दिलेली नसली तरीही त्यांचा रोका, साखरपुडा (vicky kaushal and katrina kaif engagement) झाल्याचं म्हटलं जात आहे. 

सोशल मीडियावर त्यांच्या नावानं अनेक गोष्टी सर्च केल्या जात असतानाच विकीनं तिला प्रपोज केल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. Vicky Kaushal आणि Katrina Kaif या जोडीमधलं प्रपोजल नेमकं कसं होतं, कोणी कोणाला प्रपोज केलं, कसं प्रपोज केलं आणि समोरच्या व्यक्तीनं काय उत्तर दिलं हे सारंकही या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. 

Engagment पूर्वीही Vicky Kaushal आणि Katrina Kaif मधील प्रेमाचे 'ते' क्षण झाले Viral 

 

एकाएकी प्रकाशझोतात आलेला हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. जिथं व्यासपीठावर चित्रपट दुनियेतील प्रसिद्ध चेहऱ्यांसमोर मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानसमोर विकीनं कतरिनाला चक्क 'मुझसे शादी करोगी...' असंच विचारलं आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. 'तू कोणा चांगल्या विकी कौशलला शोधून लग्नच का नाही करत, कसं आहे ना लग्नसराई सुरु आहे तर म्हटलं तुझीही इच्छा असेल म्हणून विचारतो', असं म्हणत त्यानं तिला लग्नासाठीच विचारलं. त्यावर 'हिंमत नही है....' असं उत्तर कतरिनानं दिलं.... पण, हे बोलत असतानाच तिच्या चेहऱ्यावर असणारं हसू आणि तिचे डोळे मात्र मनातलं उत्तरच सांगत होतं असं दिसतंय. 

विकीनं कतरिनाला प्रपोज केलं असेल तर हे त्यानं नेमकं कसं केलं असेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये अद्यापही कायम आहे. किंबहुना ही माहिती समोर येण्यास आणखी वेळही जाईल. तूर्तास याच व्हिडीओवर अनेकांना समाधान मानावं लागत आहे. 

Read More