Marathi News> मनोरंजन
Advertisement

'छावा' चित्रपटाचा आणखी एक विक्रम, 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडला; कमाईच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर?

Vicky Kaushal Chhaava Took Over Gadar 2 : विकी कौशलच्या 'छावा'नं सनी देओलच्या 'गरद'ला टाकलं मागे

'छावा' चित्रपटाचा आणखी एक विक्रम, 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडला; कमाईच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर?

Vicky Kaushal Chhaava Took Over Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला आहे. आता महिना होण्यात येत असला तरी त्याची क्रेझ प्रेक्षकांवरून गेलेली नाही. हा चित्रपट भारतीय सिनेमांमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आला आहे. आता या चित्रपटानं बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' ला देखील मागे टाकलं आहे. 'गदर 2' ला मागे टाकत ऑल टाइम इंडियन बॉक्समध्ये चार्टमध्ये या चित्रपटानं 10 वं स्थान मिळवलं आहे. 

रिपोर्ट्सनुसार, छावा या चित्रपटानं भारतात 526.05 कोटींची कमाई केली आहे. तर 'गदर 2' नं 525.7 कोटींची कमाई केली आहे. या कलेक्शनमध्ये तेलगूमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे देखील आकडे आहेत. हा चित्रपट अशा काही हिंदी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचं तेलगू व्हर्जन पाहायला मिळालं. तर हा चित्रपट आता शाहरुख खानच्या 'पठान' या चित्रपटाला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. पठाणनं 543.09 कोटींची कमाई केली होती. तर अ‍ॅनिमल या चित्रपटानं एकूण 553.87 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट स्त्री 2 या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार आहे. 

दरम्यान, या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर 

पहिला आठवडा : 219.25 कोटी 

दूसरा आठवडा : 180.25 कोटी 

तिसरा आठवडा : 84.05 कोटी 

शुक्रवार : 8.75 कोटी रुपये

शनिवार : 16.75 कोटी रुपये

रविवार : 11.5 कोटी रुपये

सोमवार : 6.25 कोटी 

एकूण : 526.05 कोटी 

जर या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटानं परदेशात आता 100 कोटीचं कलेक्शन करण्याच्या काहीच दूर आहे. या चित्रपटानं परदेशात 24 दिवसात 85 कोटींची कमाई केली आहे. 

हेही वाचा : 'हॅरी पॉटर' स्टार बनली अ‍ॅडल्ट स्टार! म्हणाली - कर्ज खूप वाढल्यामुळं निर्णय घ्यावा लागला

दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर हा चित्रपट आधारीत आहे. त्यांनी कशा प्रकारे मराठा साम्रज्य सांभाळलं आणि कशा प्रकारे ते शत्रूंशी लढले याविषयी दाखवलं आहे. विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिकानं येसू बाईंची भूमिका साकारली आहे. 

Read More