Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : लहान मुलाप्रमाणे नाचत तमन्नानं घेतला पावसाचा आनंद

एका बॉलिवूड फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय

व्हिडिओ : लहान मुलाप्रमाणे नाचत तमन्नानं घेतला पावसाचा आनंद

मुंबई : 'बाहुबली'फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या आपल्या आगामी सिनेमा 'बोले चुडिया'च्या तयारीत आहे. तरीही शुक्रवारी मुंबईत झालेल्या कोसळलेल्या पावसात भिजण्याचा आनंद तमन्नानंही घेतलाच. तिच्या 'रेन डान्स'चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. एखाद्या लहान मुलाप्रमाणे तमन्नाही पावसात नाचताना या व्हिडिओत दिसत आहे. 

एका बॉलिवूड फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. एकाच पोस्टमध्ये तीन व्हिडिओ शेअर करण्यात आलेत. या तीनही व्हिडिओमध्ये तमन्नाच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळत आहेत. 

या व्हिडिओत तमन्नाचा एक बुमरँग व्हिडिओ आहे. तमन्ना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. 

'बोले चुडिया' या सिनेमासाठी तमन्ना अगोदर अभिनेत्री मौनी रॉय हिला साईन करण्यात आलं होतं. परंतु, काही वादानंतर मौनीच्या जागी तमन्ना भाटिया हिला ही संधी मिळाली. तमन्नासोबत या सिनेमात नवाजुद्दीन सिद्धीकी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Read More