Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम

बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे. 

धक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम

मुंबई : बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे. 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे विकास गुप्ताच्या सांगण्यावरून ही गोष्ट केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. शिल्पा शिंदेने काही दिवसांपूर्वी विकास गुप्तावर आरोप लगावला होता. तिनेच भाभाजी घर पर है या मालिकेतून त्याला काढून टाकलं होतं. या प्रकरणावरून अनेकदा बिग बॉसच्या घरी भांडताना देखील दिसले. मात्र आज एका टास्कच्या वेळी शिल्पा शिंदे देसी लूकमध्ये दिसली. 

बिग बॉसच्या घरी एका टास्कसाठी विकास गुप्ताला घरातला क्रूर संचालक बनवलं. विकास जे काही सांगेल ते इतरांना करावंच लागणार होतं. विकासने सांगितलेलं काम जर कुणी केलं नाही तर घरी लावलेले बजर त्याला दाबावे लागणार आहेत. आणि बजर दाबताच बिग बॉसच्या प्राइज मनीमधले 3 लाख रुपये काढून विकासला दिले जाणार आहे. याच टास्क दरम्यान शिल्पा शिंदे साडी नेसून घरात वावरताना दिसतं. तसेच तिने साडी घालूनच बासुंदी देखील तयार केली. पाहा आपण देखील मजेदार व्हिडिओ 

Read More