Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video : फॅशनच्या नादात नोरा फतेही हैराण, सर्वांसमोरच घडला विचीत्र प्रकार

नोरा फतेही सध्या तिच्या 'नच बलिये' आणि 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमुळे खूप चर्चेत आहे.

Video : फॅशनच्या नादात नोरा फतेही हैराण, सर्वांसमोरच घडला विचीत्र प्रकार

मुंबई : नोरा फतेही सध्या तिच्या 'नच बलिये' आणि 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमुळे खूप चर्चेत आहे. नोरा फतेही बऱ्याच दिवसांपासून डान्स शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. अभिनेत्रीला अनेकदा शूटिंग सेटच्या बाहेर कैद केलं जातं. जिथे ती अनेकदा तिच्या ड्रेसमध्ये नाराज होताना दिसते. यावेळीही असंच काहीसं घडलं होतं. फॅशन अफेअरमध्ये नोराने मोठा ड्रेस कॅरी केला होता. जो तिला हाताळण्यासाठी त्रास होत होता.

खरंतर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही गोल्डन कलरचा डीपनेक हाय-स्लिट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. जो फ्लोअर टच डिझाइनमध्ये डिझाइन केला होता. हा ड्रेस परिधान करून नोरा कारमधून बाहेर आली. तेव्हा ती त्यात अडकली आणि त्यानंतर तिच्या एका हेल्परने तो ड्रेस सोडवण्यात मदत केली. त्यानंतर नोरा फतेहीची समस्या दूर झाली. मात्र वारंवार तिला ड्रेस सांभाळावा लागला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये नोराची खिल्ली उडवली आहे. यूजरने कमेंटमध्ये लिहिलं की, 'मोठ्या ड्रेसमध्ये बॉम्ब अडकला'. तर दुसर्‍या युजरने लिहिलं आहे की, 'स्वच्छता अभियानात सहकार्य करत आहोत'. त्याचबरोबर, अनेक युजर्सने प्रश्न केला की, हे शूटिंग झलक दिखलाजा किंवा नच बलियेचं आहे. आता लूक्सबद्दल बोलायचं झालं तर, या गोल्डन ड्रेससोबत नोरा फतेहीने न्यूड मेकअप आणि कर्ल्स हेअरस्टाइल ठेवली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Read More