Marathi News> मनोरंजन
Advertisement

भर कार्यक्रमात येताच साराची चप्पल तुटली, अभिनेत्रीने पुढे जे केलं ते कौतुकास्पद, पाहा Video

Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या ग्लॅमरस लुकने नेहमी चर्चेत असते. मात्र, अशातच तिचा प्रीमियरच्या शोमध्ये चप्पल तुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

भर कार्यक्रमात येताच साराची चप्पल तुटली, अभिनेत्रीने पुढे जे केलं ते कौतुकास्पद, पाहा Video

Sara Ali Khan Video Viral: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नेहमीप्रमाणे आपल्या भावाला म्हणजेच इब्राहिम अली खानला सपोर्ट करण्यासाठी रेड कार्पेटवर खास हजेरी लावली होती. इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट ‘सरजमीन’ च्या प्रीमियर दरम्यान सारा अली खान ब्लॅक को-ऑर्ड सेटमध्ये वेगळ्या अंदाजात रेड कार्पेटवर आली होती. पण याचवेळी एक मजेशीर आणि थोडीशी अडचणीत आणणारी घटना घडली. रेड कार्पेटवर चालताना साराची हिल अचानक तुटली.

अनेकांसाठी ही एक मोठी अडचण असती. पण साराने आपल्या कूल अंदाजात ती परिस्थिती हाताळली. ती घाबरली नाही. ती या गोष्टीनंतर लाजली देखील नाही. तिने शांतपणे एक बाजूला जाऊन तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेकडून मदत घेतली. त्यानंतर तिने आपली तुटलेली हिल दुरुस्त केली आणि पुन्हा त्याच अंदाजात ती रेड कार्पेटवर परतली.

चाहत्यांकडून हटके कमेंट

सारा अली खानच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका चाहत्याने मला वाटलं असं फक्त माझ्याच बाबतीत होतं. तर दुसऱ्याने म्हटले की, लिंकिंग रोड, बांद्रा येथूनच खरेदी केली असणार. इतकी महागडी चप्पल तरी देखील ती टिकली नाही अशा कमेंट्स सध्या चाहते तिच्या व्हायरल व्हिडीओवर करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

इब्राहिम अली खानसोबत दिल्या खास पोज

‘सरजमीन’ च्या प्रीमियर दरम्यान घडलेल्या या संपूर्ण प्रसंगानंतर सारा अली खान पुन्हा इब्राहिमसोबत रेड कार्पेटवर आली. तिने मोठ्या उत्साहात फोटोसाठी पोज दिल्या आणि भावाच्या डेब्यू चित्रपटाला सपोर्ट करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. सारा अली खानने या प्रीमियरमध्ये पूर्णपणे ग्लॅमरचा तडका लावला आणि खान कुटुंबासाठी हा एक भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.

कायोज ईरानी दिग्दर्शित ‘सरजमीन’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात इब्राहिम अली खानसोबत पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 25 जुलैपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ही कथा एका अशा वडिलांची आहे जे धमक्यांना बळी न पडता ठाम राहतात आणि एका अशा मुलाची आहे जो देशासाठी शहीद होतो. या कथेत थरार, भावना आणि अनेक रहस्यं दडलेली आहेत.

Read More