Marathi News> मनोरंजन
Advertisement

Prabhas : प्रभासच्या चाहत्यांचा जल्लोषात कांड, थिएटरमध्ये फटाके फोडताच.., पाहा Video

Prabhas Fans Light Firecrackers : बाहुबली (Bahubali) , बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथचा (South) सुपरस्टार प्रभास (Prabhas) याचाही चाहत्या वर्ग मोठा आहे. या प्रभासच्या चाहत्यांनी चक्क त्याचा वाढदिवशी कहरच केला. 

Prabhas : प्रभासच्या चाहत्यांचा जल्लोषात कांड, थिएटरमध्ये फटाके फोडताच.., पाहा Video

fallbacks

Fire Inside Film Theatre Video : चाहते आपल्या आवडत्या कलाकारांसाठी वेडे असतात. चाहते आनंदाच्या भरात कधी काय करतील याचा काही नेम नाही. साऊथमधील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) याचा जेव्हा चित्रपट थिएटरमध्ये (Theatre) प्रदर्शित होतो तेव्हा चाहत्यांचा उत्साह आपण पाहिला आहे. साऊथमधील कलाकारांचे चाहते वेडे असतात असं म्हटलं जातं. बाहुबली (Bahubali) , बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथचा (South) सुपरस्टार प्रभास (Prabhas) याचाही चाहत्या वर्ग मोठा आहे. या प्रभासच्या चाहत्यांनी चक्क त्याचा वाढदिवशी कहरच केला. 

उत्साहाच्या भरात थिएटरमध्ये...

बाहुबली फेम अभिनेत्याचा 43 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी थिएटरमध्ये त्याचा 'बिल्ला' (Billa) या खास चित्रपटाचं खास स्क्रीनिंग (screening) करण्यात आलं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह होता. या आनंदाच्या भरात स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान फटाके फोडण्यात आल्याने थिएटरमध्ये आग आली. ही घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh ) आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वेंकटरामन थिएटरमध्ये (Venkatramana theatre) हा धक्कादायक प्रकार घडला. थिएटरला लागल्यानंतर एकच खळबळ माजली. (Video prabhas fans firecrackers on theatre Viral on social media nmp)

जीवितहानी नाही...

रविवारी 23 ऑक्टोबरला प्रभासचा वाढदिवस होता त्या दिवशी ही घटना घडली. नशिबाने या दुघर्टनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नाही तर प्रभासच्या वाढदिवसाला गालबोट लागलं असतं. चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहणाऱ्या काही लोकांच्या मदतीने आग नियंत्रण मिळवलं. या घटनेत थिएटरचं मोठं नुकसान झालं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी शेकडो लोकं तिथे पोहोचले होते. 

Read More