Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

बॉलिवूडमध्ये जोड्या बनणं आणि तुटणं सामान्य बाब आहे... आता एक नवी जोडी प्रेक्षकांना धक्का देऊ शकते. 

व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

मुंबई : बॉलिवूडमध्ये जोड्या बनणं आणि तुटणं सामान्य बाब आहे... आता एक नवी जोडी प्रेक्षकांना धक्का देऊ शकते. 

ही जोडी म्हणजे, आलिया भट्ट आणि पहिल्यांदाच तिच्यासोबत काम करणारा रणबीर कपूर... गेल्या काही दिवसांपासून आलिया-रणबीरमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येतंय. आत्तापर्यंत या केवळ चर्चा असल्याचं दिसत होतं... पण, या जोडीवर आता इंडस्ट्रीतल्याच दोन जणांनी शिक्कामोर्तब केलंय. 

डिझायनर मनिष मल्होत्रा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतेच नेहा धूपियाचा चॅट शो 'वोग बीएफएफ'मध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमात सोनाक्षी आणि मनिषनं बॉलिवूडचे काही धक्कादायक खुलासे केलेत. या कार्यमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

दीपिका - रणवीरची जोडी

बॉलिवूडची अशी जोडी ज्यांनी आत्तापर्यंत खुलेपणानं आपलं नातं स्वीकार केलेलं नाही... या प्रश्नावर सोनाक्षीनं म्हटलं दीपिका आणि रणवीर.. 

आलिया - रणबीरची जोडी

त्यानंतर नेहानं २०१८ मध्ये कोणती जोडी बनणार? असा प्रश्न विचारल्यावर सोनाक्षीनं मनिषकडे पाहिलं... आणि मनिषनं उत्तर दिलं आलिया आणि रणबीर कपूर... त्याचं हे उत्तर मजेत नव्हतं तर तो गंभीरपणे बोलत होता. 

आलिया आणि रणबीर सध्या अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्र' सिनेमामध्ये एकत्र काम करत आहेत. याच दरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झालीय. उल्लेखनीय म्हणजे, आलियाची रणबीरच्या याआधीच्या दोन्ही गर्लफ्रेंड अर्थात कतरिना कैफ आणि दीपिका पादूकोण या दोघींशीही मैत्री आहे.   

आलिया - सिद्धार्थचं ब्रेकअप?

त्यानंतर नेहानं कोणती जोडी २०१८मध्ये तुटणार? या प्रश्नावर सोनाक्षीनं अगदी सहजपणे 'आलिया आणि सिद्धार्थ' असं उत्तर दिलं... त्यावर नेहाननं सोनाक्षीला आठवण करून दिलीय की 'आलिया आणि सिद्धार्थ नात्यात होते...'   

Read More