Marathi News> मनोरंजन
Advertisement

Neha Kakkar वर का आली म्हशींच्या गोठ्यात जायची वेळ ?

नेहा म्हशींच्या गोठ्यामध्ये पोहोचली आहे ती म्हणजे ... 

Neha Kakkar वर का आली म्हशींच्या गोठ्यात जायची वेळ ?

मुंबई : गायिका नेहा कक्कर ही तिच्या गायनासोबतच तिच्या अनोख्य़ा आणि काहीसा खोडकर अंदाजासाठीही ओळखली जाते. जाईल त्या ठिकाणी नेहा तिची अशी वेगळी छाप सोडताना दिसते. तिच्या एका स्मितहास्यावर अनेकजण घायाळ होतात. कारकिर्दीत यशाच्या शिखरावर अतिशय कमी वेळात पोहोचलेल्या याच नेहावर आता म्हणजे थेट म्हशींच्या गोठ्यात जायची वेळ आली आहे. आता ते नेमकं का, हे खाली असणाऱ्या व्हिडीओतून तुम्हाला कळेलच. 

नेहा म्हशींच्या गोठ्यामध्ये पोहोचली आहे ती म्हणजे तिथे जाऊन थेट काम करण्यासाठी. म्हशींच्या या गोठ्यामध्ये तिला काही सराईतांची साथ मिळाली आहे. तर, मोस्टली सेन, या नावानं ओळखली जाणारी प्राजक्ता कोळीसुद्धा तिला इथं साथ देताना दिसत आहे. गाणं गाणाऱ्या नेहाच्या हाती दुधानं भरलेली बादली पाहून प्रथमत: सर्वांना धक्काच बसतो. पण, हे सारंकाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आल्याचं व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे. 

म्हशीचं दूध काढणाऱ्या नेहावर इथं धूम ठोकून पळण्याचीही वेळ येते. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. हा व्हिडीओ सध्य़ाचा नसून तो काही दिवसांपूर्वीचा आहे. एका फॅनपेजवरुन नेहाचा हा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळताना दिसत आहेत. 

Read More