Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO TRAILER : काशिनाथ पर्व घेऊन येतोय 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'

 ७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

VIDEO TRAILER : काशिनाथ पर्व घेऊन येतोय 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'

मुंबई : बहुप्रतिक्षित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमात बहुगुणी अभिनेता सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

लोकमान्य टिळक, नारायणराव बालगंधर्व यांच्या भूमिका साकारल्यानंतर सुबोधचा 'भावे प्रयोग' डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या निमित्तानं सुरुच आहे. 

६० च्या दशकात रंगभूमीचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलाय. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशा अनेक नाटकांमधून काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या होत्या.  

येत्या दिवाळीत म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  

Read More