Marathi News> मनोरंजन
Advertisement

आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये मलायका रॅम्पवर; ड्रेस सांभाळताना 'अशी' फसली

आपल्या याच फॅशन सेन्समुळे मलायका भलतीच चर्चेत राहते. 

आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये मलायका रॅम्पवर; ड्रेस सांभाळताना 'अशी' फसली

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. खूप तरूणींसाठी ती फॅशन आयकॉन आहे. तिच्या हटके फॅशनमुळे ती चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे अनेक फोटोज हे व्हायरल होत असतात. कुठल्या पार्टीसाठी असो वा वेकेशनसाठी मलायकाचा हरएक लुक हा ट्रेण्डिंग असतो. लो नेकचे कपडे असतील किंवा हाय नेकचे. बिकीनी लुक असो वा ट्रान्सपरंट लुक. कुठल्याही लुकमध्ये ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते किंवा अगदी साडीतही मलायका खुपच हॉट दिसते. आपल्या याच फॅशन सेन्समुळे मलायका भलतीच चर्चेत राहते. 

गेल्या अनेक दिवसांपासून मलायका आपल्या जीमलूकमुळे खूपच चर्चेत आहे. त्यातून ती ठिकठिकाणी स्पॉट होत राहते. सध्या मलायका आपल्या अशाच एका हॉट लुकमुळे चर्चेत आहे. FDCI fashion couture 2022 या शोसाठी तिने दिल्ली येथे नुकतीच हजेरी लावली होती. हा फॅशन शो भारतातला नामवंत फॅशन शो समजला जातो. या शोमध्ये मलायका शोज स्टॉपर म्हणून आली होती. फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहूल खन्ना यांच्या शोसाठी तिने रॅम्प वॉक केला.

यावेळी तिने काळ्या रंगाचा शिमर असलेला ट्रान्सपरंट डीप नेक गाऊन घातला होता. त्यावेळी मलायका खूपच हॉट दिसत होती. परंतु हा ड्रेस सांभाळताना मात्र मलायकाच्या नाकी नऊच आले. डिप नेक असलेला आणि लेग कट असलेला हा गाऊन सांभाळताना मलायकाची त्रेधातिरपिट उडाली. oops moment लाही तिला काही प्रमाणात समोरे जावे लागले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे मलायका या ड्रेसमध्ये सुंदर तर दिसत आहेच पण या लुकवर तिच्या वयाचाही अंदाज येत नसल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे तर तिच्या या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे अनेकांनी तिच्यावर नाराजीही व्यक्त केली आहे, नेटकरी तिच्या या ट्रान्सपरंट ड्रेसवर असंही म्हणाले की, आता लपवण्यासारखं राहिलं तरी काय आहे. तर काहींनी तिच्या वयावरूनही तिला उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Read More