Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नोटबूक' चित्रपटातील एक व्हिडीओ व्हायरल

 झहीर आणि मुलांमधील केमिस्ट्रि फार छान दिसत आहेत.

'नोटबूक' चित्रपटातील एक व्हिडीओ व्हायरल

मुंबई : दिग्दर्शक नितीन कक्कड यांच्या दिग्दर्शनाखाली 'नोटबूक'  चित्रपट साकारण्यात येत आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये झहीर आणि मुलांमधील केमिस्ट्रि फार छान दिसत आहेत. झहीर मुलांना इंग्रजी अक्षरे शिकवत आहे आणि तिकडे अचानक एक साप येतो. तेव्हा मुलांमध्ये आणि झहीरमध्ये एकच गोंधळ उडतो. असे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

अभिनेता मनिष बहलची मुलगी प्रनूतन बहल 'नोटबूक'  सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिनेमात प्रनूतन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात झहीर इक्बाल सुद्धा डेब्यू करणार आहे. सिनेमाची कथा एका प्रेमकथेवर बेतलेली असून जम्मू-काश्मीर मध्ये सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे. 

सिनेमात प्रनूतन शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर इक्बाल तिच्या जागी इक्बाल नोकरी साठी रूजू होतो. सिनेमात या दोघांमध्ये असलेले प्रेम संबंध चाहत्यांना अनूभवता येणार आहे. त्याचप्रमाणे काश्मीरच्या प्रश्नांवरही सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. २९ मार्च रोजी चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.  

Read More