Marathi News> मनोरंजन
Advertisement

शर्टशिवाय बर्फात तीन तास राहिला अभिनेता; पाहा व्हिडिओ

बॉलीवूडचा मार्शल आर्ट किंग विद्युत जामवाल नेहमी चर्चेचा विषय असतो. 

शर्टशिवाय बर्फात तीन तास राहिला अभिनेता; पाहा व्हिडिओ

मुंबई : बॉलीवूडचा मार्शल आर्ट किंग विद्युत जामवाल नेहमी चर्चेचा विषय असतो. अलीकडेच विद्युत जामवालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्युत जामवाल शर्टशिवाय बर्फात बसेलेला दिसत आहे. विद्युत जामवालचा हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. अखेर विद्युतला असं धोकादायक कृत्य करण्या मागचं कारण काय होतं, जाणून घेऊया.

विद्युत जामवालने केला खतरनाक स्टंट 
जगातील टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये विद्युत जामवालचं नाव समाविष्ट आहे. अनेकदा विद्युत जामवाल मार्शल आर्टशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. अलीकडे, मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विद्युत शर्टशिवाय बर्फात बसलेला दिसत आहे. खरंतर विद्युत जामवालचा व्हिडिओ म्हणजे त्याचं मार्शल आर्ट आहे.

यासाठी विद्युत जामवाल याने ३ तासांसोठी आपली बॉडी बर्फाच्या हवाली केली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्युत जामवाल हा मार्शल आर्ट अत्यंत काळजीने स्थिर मुद्रेत करत आहे. विद्युत जामवालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विद्युत लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे
आपल्या धमाकेदार स्टंट व्हिडिओंद्वारे सोशल मीडियावर चर्चेत आलेला विद्युत जामवाल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. खरंतर, विद्युत जामवालचा आगामी चित्रपट खुदा हाफिज चॅप्टर 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

Read More