Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी नक्कीच लग्न करेन, सध्या पार्टनर...'; रश्मिका मंदानाचं नाव घेताच अशी होती विजय देवरकोंडाची Reaction

Vijay Deverakonda on Rashmika Mandanna : विजय देवरकोंडानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रश्मिकासोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं पाहा. 

'मी नक्कीच लग्न करेन, सध्या पार्टनर...'; रश्मिका मंदानाचं नाव घेताच अशी होती विजय देवरकोंडाची Reaction

Vijay Deverakonda on Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नात्याविषयी नेहमीच आपल्याला काही ना काही ऐकायला मिळतं. विजय आणि रश्मिकाच्या साखरपुड्याची चर्चा ही नेहमीच ऐकायला मिळते. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विजयनं साखरपुड्याच्या अफवा, लग्न आणि रश्मिकावर वक्तव्य केलं आहे. 

रश्मिकासोबत स्क्रिनवर केमिस्ट्री दाखवण्यात अडचण येणार नाही

फिल्मफेयर मॅगझीनला विजय देवरकोंडानं ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रश्मिका मंदानाविषयी बोलताना तो म्हणाला की मी रश्मिकासोबत जास्त काम किंवा चित्रपट केले नाही. मी तिच्यासोबत आणखी चित्रपट करायला हवे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती एक सुंदर महिला आहे आणि त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये काही अडचण येणार नाही. ती खूप मेहनती आहे. ती तिच्या इच्छा आणि कॉन्फिडन्सनं कोणत्याही गोष्टीला हरवू शकते. ती दयाळू आहे आणि स्वत: पेक्षा इतरांच्या आनंदाला महत्त्व देते.'   

रश्मिका आदर्श पत्नीच्या निकषांमध्ये बसते का?                  

मुलाखती दरम्यान, रश्मिला डेट करण्याविषयी विजयनं होकारही दिला नाही किंवा नकारही दिला नाही. लग्नाविषयी बोलताना विजय म्हणाला, 'मी लग्न नक्कीच करेन. सध्या मी पार्टनरच्या शोधात नाही.' विजयला जेव्हा विचारण्यात आलं की 'आदर्श पत्नीच्या निकषांमध्ये रश्मिका बसते का?' तर उत्तर देत विजय म्हणाला, 'कोणतीही चांगल्या मनाची मुलगी या निकषांमध्ये बसते.'

रश्मिका आणि विजय नेहमीच एकत्र दिसतात. दोघं अनेकदा डेटवर जातात. ज्यामुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा सुरु असतात. दोघांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपला ऑफिशिअल केलेलं नाही.  

हेही वाचा : 'नरक किंवा पाकिस्तान दोघांपैकी एक निवडायचं असेल, तर मी...,' जावेद अख्तर असं का म्हणाले?

त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर रश्मिका मंदाना ही नुकतीच सिकंदर या चित्रपटात दिसली. या चित्रपटातं तिनं सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तासांनंतर रश्मिकाला मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये रुमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत पाहिलं. असं म्हटलं जातं की दोघं लंच डेटवर गेले होते. मात्र, दोघांनी कधीच त्यांच्या नात्याला ऑफिशिअली मान्य केलं नाही. दोघं एकमेकांना नेहमीच चांगले मित्र आहेत असं सांगताना दिसतात. 

Read More