Vijay Devarakonda's Saamraajya: विजय देवरकोंडाच्या 'साम्राज्य' या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटातील अप्रतिम दृश्ये, जबरदस्त संगीत आणि विजयचा दमदार अभिनय यामुळे चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे. कथेत काही त्रुटी असूनही चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत धरुन ठेवले आहे.
'साम्राज्य' ही चित्रपट आज, गुरुवार, 31 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले असून काहींनी तर याला विजयचे 'कमबॅक' म्हटले आहे. ही स्पाय थ्रिलर कथा विजयच्या कारकिर्दीतील 'द फॅमिली स्टार' (2024) नंतरची पहिली मोठी रिलीज आहे. अनेकांच्या मते विजयने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय या चित्रपटात केला आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसतो, जो एका मोहिमेसाठी श्रीलंकेला जातो.
Sensational Openings for #Kingdom all over, It's @TheDeverakonda's show all the way, such screen presence This man can pull off any Genre with ease like a Superstar pic.twitter.com/hRPiGlh7nX
— V M R (@vasireddy1905) July 31, 2025
एका नेटकऱ्याने लिहिले, 'विजयने उत्कटतेने आणि आत्मविश्वासाने ही भूमिका साकारली आहे. कथेत त्रुटी असल्या तरी तो प्रत्येक सीनमध्ये जिवंतपणा आणतो. अनिरुद्धचे संगीत जबरदस्त!' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले,'पहिला भाग आकर्षक आहे, कथानक कुठेही विचलित होत नाही. विजय, सत्यदेव आणि वेंकटेश व्हीपी यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. दुसऱ्या भागासाठी भक्कम पाया घातला आहे.' तर काहींनी याला 'भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठे पुनरागमन' म्हटले आहे.
Positive talk from all over #KingdomMANAMKODTHUNAM #KingdomOnJuly31st @TheDeverakonda @VDTrendsOffl pic.twitter.com/1VS78Ajq01
— UrstrulyVijju_ (@UrstrulyVijju_) July 31, 2025
एका चाहत्याने लिहिले, 'बोट फाईट सीक्वेन्स अंगावर शहारे आणतो. अॅक्शन, भावना आणि भव्य सादरीकरण यांचा अप्रतिम संगम आहे.' तर दुसऱ्याने म्हटले, 'कथा साधी आहे, पण तिचे चित्रपटमय सादरीकरण उत्कृष्ट आहे. तांत्रिक टीमलाही पूर्ण गुण!'
हे ही वाचा: आई शिक्षिका, वडील उद्योगपती, सलमानच्या सल्ल्याने बदलले या अभिनेत्रीने तिचे नाव, आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित हा तेलुगू चित्रपट सितारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमाज यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे. विजयसोबत भाग्यश्री बोरसे प्रमुख भूमिकेत आहे. मूळतः हा चित्रपट 30 मे रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावामुळे रिलीज पुढे ढकलून 31 जुलै रोजी करण्यात आले.