Marathi News> मनोरंजन
Advertisement

विजय माल्यानं 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं केलं होतं कन्यादान, म्हणाली, 'तो माझ्या आईकडून...'

Vijay Mallya : विजय माल्यानं या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचं केलं होतं कन्यादान...

विजय माल्यानं 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं केलं होतं कन्यादान, म्हणाली, 'तो माझ्या आईकडून...'

Vijay Mallya : विजय माल्या हे एक असं नाव आहे जे कायमच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतं. कधी क्रिकेटमुळे, कधी एखाद्या अभिनेत्रीच्या नावाशी जोडल्यामुळे. नुकतंच आरसीबीनं पहिल्यांदाच आयपीएल जिंकलं आणि माल्यांनी लंडनहून सेलिब्रेशन केलं. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पण या वेळी त्यांच्या खासगी आयुष्यातील एक गंमतशीर गोष्ट समोर आली आहे. एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना अजूनही माहिती नसेल.

विजय माल्यांनं केलं एका बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान

तुम्हालाही हे वाचून आश्चर्य झालं असेल, पण विजय माल्यानं बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीचं कन्यादान केलं होतं. समीरा रेड्डीनं 2014 मध्ये एका मुलाखतीत ही आठवण सगळ्यांसोबत शेअर केली होती. समीरानं ही मुलाखत डीएनएला दिली होती. समीरा रेड्डीनं अक्षय वर्देसोबत मराठी परंपरेन 21 जानेवारी 2014 रोजी लग्न केलं होतं. सुरुवातीला हे लग्न एप्रिलमध्ये ठरलं होतं, पण काही कारणास्तव तारीख पुढे-पुढे झाली आणि अखेर जानेवारीत लग्न झालं.

विजय माल्यानं केलं समीराचं कन्यादान

याच मुलाखतीत समीरा म्हणाली की, 'फक्त विजय माल्या, जे माझ्या आईच्या बाजून माझे नातेवाईक आहेत. त्यानं माझं कन्यादान केलं. लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.' हिंदू विवाहप्रथेमध्ये कन्यादान ही फार महत्त्वाचा विधी असतो, जिथे वडीलधारी मंडळी वधूला वराला एकत्र राहण्यासाठी आशीर्वाद देतात आणि थोडक्यात वधूला आता ती कायम स्वरूपी त्या वराची जबाबदारी आहे असा या विधीचा थोडक्यात अर्थ आहे. 

हेही वाचा : दिलजीत दोसांझच्या चित्रपटात झळकणार पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल

समीरा रेड्डी सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती आपल्या कुटुंबात आणि मुलांमध्ये रमली आहे. अभिनय क्षेत्रात समीरा यांनी अनेक छान भूमिका केल्या होत्या आणि त्या आपल्या सुंदरतेसाठी, स्पष्ट बोलण्यासाठी, बोल्डनेस आणि अभिनयामुळे लोकांच्या लक्षात राहिल्या.दरम्यान, समीरा रेड्डीचं लग्न आणि तिचं कन्यादान ही गोष्ट म्हणजे विजय माल्याच्या आयुष्यातील अजून एक वेगळी बाजू आहे आणि ही त्याच्या आयुष्यातील लक्षवेधी आठवण म्हणता येईल.

Read More