Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकास आणि पार्थ रिलेशनशिपमध्ये? 'तो' खासगी फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण

विकास आणि पार्थचा एकत्र फोटो व्हायरल होताचं फक्त इंडस्ट्रीत नाही तर चाहत्यांमध्ये देखील चर्चा   

विकास आणि पार्थ रिलेशनशिपमध्ये? 'तो' खासगी फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण

मुंबई :  'बिग बॉस 14' फेम विकास गुप्ता (Vikas Gupta)  कायम एखाद्या कारणामुळे चर्चेत असतो.  विकास त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी नात्यांमुळे जास्त चर्चेत असतो. अनेक वर्षांपूर्वी विकास आणि टीव्ही अभिनेता पार्थ समथान यांनी त्यांच्या रिलेशनशिपमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर विकास गुप्ता आणि पार्थ समथानचे फोटो लीक झाले आणि सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं. 

विकास गुप्ता आणि पार्थ समथान यांचे आक्षेपार्ह फोटो लीक झाल्याने टीव्ही इंडस्ट्री अचानक हादरली. त्यांचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्यावर पार्थने विकास गुप्ताला कायदेशीर नोटीस पाठवली. विकास गुप्ताने पार्थ समथानचे पैसे दिले नसल्याचे सांगण्यात आले.

fallbacks

एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी पार्थ समथानने विकास गुप्तावर अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता.  दरम्यान दोघांच्या त्या खासगी फोटोमुळे फक्त इंडस्ट्री नाही तर त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील चर्चा रंगल्या होत्या. दोघे बायसेक्शुअल bisexual असल्याचं सुद्धा अनेकदा सांगण्यात आलं.

विकास आणि पार्थमध्ये घट्ट संबंध असल्याचं देखील अनेकदा समोर आलं. 'कैसी ये यारियां' या टीव्ही मालिकेदरम्यान दोघांची भेट झाली होती. विकास गुप्ता मालिकेचा निर्माता होता.

Read More