Marathi News> मनोरंजन
Advertisement

पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'

Vikrant Massey Gets Trolled : विक्रांत मैसीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'

Vikrant Massey : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या आधी विक्रांत चर्चेत येण्याचं कारण करवाचौथ होतं. आता विक्रांत का म्हणून करवाचौथमुळे चर्चेत आला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण आहे त्यानं त्याच्या पत्नीचा पाया पडून आशीर्वाद घेणं आहे. विक्रांतनं त्याच्या पत्नीचे पाया पडल्यानं नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. आता विक्रांत मैसीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याशिवाय सगळ्यांनीच असं का करायला हवं याविषयी सांगितलं आहे.

'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मैसीनं या सगळ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. विक्रांत म्हणाला, "माझ्या फोनमध्ये सहा फोटो होते, पण त्यातील फक्त 4 चं चर्चेचा विषय ठरले. काही लोकांना ते फोटो आवडले, तर काही लोकांनी या फोटोंसाठी मला ट्रोल केलं. पण त्या मागचं कारण मला काही कळलंच नाही. मला वाटतं की जर तुम्हाला घरात शांतता हवी असेल तर वेळोवेळी आपल्या पत्नीचा पाया पडायला हवं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विक्रांतनं पुढे सांगितलं की "लोकांनी ते फोटो व्हायरल केले. ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि मला वाटतं की लक्ष्मीच्या पाया पडायला हवं. मी अभिमानानं बोलतो की ती माझ्या आयुष्यात 10 वर्षांपूर्वी आली होती आणि काही चांगलं होण्यासाठी माझ्या आयुष्यात काही बदल घेऊन आली. जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझ्यासोबत फक्त चांगल्या गोष्टी झाल्या आणि गोष्टी अशाच ठेवण्यासाठी मी तिच्या पाया पडतो." 

याशिवाय विक्रांतनं एका मुलाखतीत खुलासा केला की या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याला सतत सोशल मीडियावर धमक्या देण्यात येत आहेत. 

हेही वाचा : हार्दिक पांड्याच्या Ex पत्नीला ट्रेनर अ‍ॅलेक्स अ‍ॅलेक्झॅन्डरनं नेसवली साडी; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दरम्यान, विक्रांत मैसीनं 2022 मध्ये शीतल ठाकुरशी लग्न केलं. विक्रांत मैसीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात विक्रांतसोबत मैसीशिवाय राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Read More