Marathi News> मनोरंजन
Advertisement

तक्रार दाखल झाल्यानंतर व्हायरल गर्ल प्रियाने दिली प्रतिक्रीया...

मल्यालम सिनेमा उरू अदार लव च्या छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर.

तक्रार दाखल झाल्यानंतर व्हायरल गर्ल प्रियाने दिली प्रतिक्रीया...

नवी दिल्ली : मल्यालम सिनेमा उरू अदार लव च्या छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर आणि या चित्रपटाचे निर्मात्यांविरोधात हैद्राबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिनेमाचे प्रदर्शित झालेले पहिल्याच गाण्याच्या शब्दांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रार दाखल

मुसलमानांच्या भावना दुखावल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैद्राबादमध्ये या सिनेमाविरूद्ध तक्रार दाखल केलेल्या सैय्यद इलयास यांनी झी न्यूजशी बोलताना सांगितले की, गाण्यात अल्लाह चे नाव घेण्यात आले आहे. यावर अभिनेत्री प्रिया प्रकाशनेही प्रतिक्रिया दिली आहे.

यावर प्रियाची प्रतिक्रीया

प्रियाने सांगितले की, मला जी काही प्रसिद्धी मिळाली ती अचानक मिळाली आहे. मला समजत नाही की मी यावर कशी प्रतिक्रिया देवू. डोळ्यांच्या इशाऱ्याचा सीन पहिल्यापासून ठरवला नव्हता. यावर करण्यात आलेल्या तक्रारीबद्दल मला अधिक काही माहित नसल्याने यावर माझे शांत राहणेच योग्य ठरेल.

याबद्दल बोलताना मौलाना साजिद रशीदी यांनी सांगितले की, तक्रार फक्त पब्लिसिटीसाठी दाखल करण्यात आली आहे. या गाण्यात काहीचे वावगे नाही. विनाकारण याचा इशू केला जात आहे. 

रातोरात प्रसिद्ध

प्रिया प्रकाशचा हा व्हिडिओ मल्यालम सिनेमा 'उरु अदार लव (Oru Adaar Love)'चा आहे. त्याची एक लहानशी झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि प्रिया प्रकाश रातोरात प्रसिद्ध झाली. तिला एका दिवसात ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स मिळाले. तिचे इंस्टाग्रामवर आता १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

प्रियाचा पहिला चित्रपट

उरु अदार लवचा नवा टीझर काल संध्याकाळी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये प्रिया आणि रोशन क्लासरुममध्ये बसलेले आहेत आणि दोघेही एकमेकांना बघत आहेत. तेव्हा प्रिया बोटांना किस करत बंदुक चालवण्याचा इशारा करते आणि रोशन प्रियाच्या अदांनी घायाळ होतो. दोघांचाही हा पहिला सिनेमा असून ईदच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Read More