Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर ट्रोलर्सने मलायकाच्या ''दुखणाऱ्या नसेवर बोट ठेवलं'' कारण होतं तिचा शॉर्ट ड्रेस...

बॉलिवूड अभिनेत्री, आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा कायम चर्चेत असते. 

अखेर ट्रोलर्सने मलायकाच्या ''दुखणाऱ्या नसेवर बोट ठेवलं'' कारण होतं तिचा शॉर्ट ड्रेस...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. तिच्या बर्‍याच पोस्ट्स योगासंबधीत किंवा वर्कआऊट करण्यासंबधीत असतात. ती तिच्या चाहत्यांनाही स्वतःप्रमाणेच योगा आणि वर्कआऊट करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा जेव्हा तिला घराबाहेर स्पॉट केलं जातं तेव्हा पापराझी तिच्याभोवती असतात. ती सहसा पापाराझींना निराश करत नाही, मात्र कधीकधी ती सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होते.

नुकतीच मलायका अरोरा जिम करायला बाहेर पडली असताना पापाराझीने तिला थांबवलं. त्याचवेळी, वाहतूक पोलिस कर्मचारीही तिथे उपस्थित होते. पापराझींनी तिचे फोटो काढले आणि पोलिसांनाही पोझ देण्याची विनंती केली. मलायकानेही पोलिस कर्मचाऱ्यासह फोटो काढला. त्या फोटोदरम्यान ती जिमच्या कपड्यांमध्ये होती. आता सोशल मीडियावर तिला नेटकरी या कारणासाठी ट्रोल करत आहेत. कारण तिन्हे जिम पोशाखात ट्रॅफिक पोलिसांसोबत फोटो काढला 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या दिवशी मलायका जिम करण्यासाठी तिच्या सोसायटीच्या गेट बाहेर पडली. यावेळी पापराझी तिथे तिची वाट पहात होते. पापाराझींने मलायकाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वाहतूक पोलिस कर्मचारीही तिथे होते. पापाराझीच्या सांगण्यावरून मलायकानेही ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढला. यानंतर तिने पापाराझीकडे हात फिरविला आणि गाडीमध्ये बसली.

व्हायरल भयानीने त्यांच्या इन्स्टा अकाउंन्टवर मलायकाचा ट्रॅफिक पोलिसांबरोबरचा जिम वियरमधला हा व्हिडिओ शेअर केला होता, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलाइकाने पोलिस कर्मचाऱ्यांने ज्या ड्रेसमध्ये पोझेस केले आहे त्यासाठी लोक तिला ट्रोल करत आहेत. 

Read More