Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIRAL VIDEO : सलमान म्हणतो, 'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती'

 यामध्ये तो आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला मारहाणीचं स्पष्टीकरण देताना दिसतोय.

VIRAL VIDEO : सलमान म्हणतो, 'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती'

नवी दिल्ली : तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर #Metoo कॅंम्पेनने आणखी जोर धरलायं. फिल्म इंडस्ट्री, मीडिया अशा विविध क्षेत्रातील महिला लैंगिक शोषणाशी संबंधित पुरुषांची नावं सोशल मीडियातून समोर आणतं आहेत. अशावेळी सलमान खानचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला मारहाणीचं स्पष्टीकरण देताना दिसतोय.

या व्हिडिओत एक महिला पत्रकार बॉलीवुड 'दबंग खान'ला ऐश्वर्या रायने केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारते. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर सलमान देतो. काही वेळापूर्वी प्रभु चावलाने हा प्रश्न मला विचारला तेव्हा मी टेबलवर हात मारला आणि टेबल तुटला. मी कोणाला मारतोय तर आमच्यात लढाई सुरू आहे हे जाहीर आहे. जर मी तसं केलं असतं तर मला वाटत नाही ती जगली असती.

 

'सलमान मारहाण करायचा'

 1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या जास्त जवळ आले. याच्या तीन वर्षांनंतर हे नातं तुटलं. सलमान खानचा आक्रमकपणा हे नातं तुटण्याला कारणीभूत होता. सलमानचं हिंसक वागणं हे आमच नात तुटण्यास कारणीभूत असल्याचे खुद्द ऐश्वर्या रायने सांगितलं.

सलमान माझ्यावर संशय घ्यायचा. 'माझे इतर स्टार्ससोबत अफेयर असल्याचं वायफळ बोलत राहायचा. काहीतरी भांडण काढून मारहाण करायचा.

सुदैवाने माझ्या शरीरवार कोणती जखम आली नाही. माझ्यासोबत काही झालंच नाही असं समजून मी शूटींगला जायची. स्वाभिमानी महिलेप्रमाणे मी हे नातं तोडलं.' असं तिने सांगितलं.

Read More