Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नुकतेच स्पॉट झाले

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई?

मुंबई : सोमवारी सुट्टीवरून परतलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नुकतेच स्पॉट झाले. ते हॉस्पिटल बाहेर दिसताच त्यांचे चाहते दोघांबद्दल थोडे घाबरले होते. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली तर काही चाहते विरुष्काच्या चिंतेत आहेत.

मिळणार आहे दूसरी Good News?
हे आम्ही नाही म्हणत आहोत ना आम्ही अंदाज लावत आहोत. पण हा अंदाज सोशल मीडियावर युजर्सनी लावला आहे. विराट आणि अनुष्का हॉस्पिटलमध्ये जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही यूजर्सनी अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नंट असल्याची अटकळ बांधायला सुरुवात केली. एका युजर्सने कमेंट करत सांगितली दुसरी गुडन्यूज येणार आहे का? तर काही युजर्स दोघांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुष्का आणि विराट वेकेशनवरून परतले आहेत
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अलीकडेच मालदीवमध्ये छोट्या सुट्टीवर गेले होते आणि आज सकाळी ते मुंबईत परतले आहेत आणि परत येताच अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाले. अनुष्काने तिच्या मालदीव व्हेकेशनचा एक छान फोटोही शेअर केला होता. ज्यावरून हे स्पष्ट होतं की, दोघंही या सुट्टीचा मनमोकळेपणाने आनंद घेतला आहे.

Read More