Marathi News> मनोरंजन
Advertisement

Anushka Sharma-Virat kohli दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? खरं कारण आलं समोर

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा रंगलीय. 

Anushka Sharma-Virat kohli दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? खरं कारण आलं समोर

मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय जोडी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा रंगलीय. हॉस्पिटलमधून समोर आलेल्या एका व्हिडिओनंतर या चर्चेला उधाण आले होते. मात्र या संदर्भात अद्याप तरी अनुष्का शर्मा- विराट कोहली यांनी दुजोरा दिला नाही आहे. 

विराट आणि अनुष्का कोकिलाबेन नुकतेच धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना स्पॉट झाले होते. हॉस्पिटलमधला या दोघांचा हा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओवरून अनेकांनी अनुष्का प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला होता.सोशल मीडियावर सुद्धा अनुष्का प्रेग्नेट असल्याची चर्चा रंगली आहे. 

हे आहे कारण...
अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर आता खरं कारण समोर आलं आहे.  विराट कोहली आणि अनुष्का हॉस्पिटलमधून निघतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याचा अंदाज लावला होता. मात्र चाहत्यांचे हार्ट ब्रेकींग बातमी आहे.कारण चाहत्यांना आता धीर धरावा लागणार आहे. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का विराटसोबत फिजिओथेरपिस्टला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली असल्याची माहिती आहे. 

या चित्रपटात दिसणार  

अनुष्का शर्मा एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनुष्का 'चकडा एक्सप्रेस'मध्ये भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. झुलनची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. या चित्रपटात अनुष्का कशी भूमिका साकारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Read More