Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चेत गुवाहाटीवरून तातडीनं मुंबईत परतला विराट कोहली!

Anushka Sharma-Virat Kohli : विराट कोहली गुवाहाटीवरून थेट तातडीनं मुंबईला का निघाला याचं कारण समोर आलं नसलं तरी तो अनुष्काच्या प्रेग्नंसीसाठी मुंबईला परतल्याचे म्हटले जात आहे. 

अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चेत गुवाहाटीवरून तातडीनं मुंबईत परतला विराट कोहली!

Anushka Sharma-Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. ही चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. पण विराट किंवा अनुष्का या दोघांनी याविषयी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. दरम्यान, 5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरु होत आहे. त्याआधी वॉर्मअप मॅचेस गुवाहाटीला सुरु होणार असताना, विराट कोहली अचानक तिथून मुंबईला परतला आहे.

'बॉलिवूड लाइफ'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातं आहे की विराट कोहली अचानक तातडीनं मुंबईला परतला आहे. त्यामुळे अनुष्काची प्रेग्नेंसीच्या बातमी ही खरी आहे अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. विराट इतक्या तातडीनं का मुंबईला परतला त्याचं कारण अजून समोर आलेलं नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का आणि विराट लवकरच दुसऱ्या प्रेग्नंसीविषयी घोषणा करणार आहेत. त्यात कोहलीनं गुवाहाटीला असलेली भारतीय क्रिकेट टीमसोबत तिरूवंतपुरमला न जाता थेट मुंबईला आला आहे. मुंबईला येण्यासाठी काही पर्सनल इमरजेंसी असल्याचे त्यानं सांगितल्याचे म्हटले जात आहे. 

तिरुवंतपुरमला का गेली भारतीय क्रिकेट टीम?

आशिया कपनंतर आता चाहते ICC ODI Cricket World Cup कधी सुरु होणार याच्या प्रतिक्षेत होते. आता तो क्षण जवळ आला आहे. 12 वर्षांनंतर भारतात वर्ल्ड कप खेळण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरु होत आहे. तिरुवनंतपुरममध्ये मंगळवारी म्हणजे उद्या भारत आणि नेदरलॅंडमध्ये सामना होणार आहे. 

हेही वाचा : World Cup आधी विराट-अनुष्काची Good News, लवकरच होणार आई-बाबा?

अनुष्का आणि विराटविषयी बोलायचे झाले तर 11 डिसेंबर 2017 मध्ये ते लग्न बंधनात अडकले. इटलीमध्ये त्यांनी गुपचूप सप्तपदी घेतल्या. त्यांचं लग्न हे खूप प्रायव्हेट होतं. ज्यात कुटुंबातील लोक आणि काही जवळचे मित्र-मैत्रीण होते. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्का आणि विराटच्या आयुष्यात वामिका आली. 11 जानेवारी रोजी अनुष्कानं वामिकाला जन्म दिला. त्या दोघांनी अजून वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. वामिकाच्या जन्मला दोन वर्ष होताच अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु झाली आहे. 

Read More