Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vivek Oberoi ला शिक्षा भोगल्यावर सुचलं शहाणपण

विवेकला एक चूक पडली महागात 

Vivek Oberoi ला शिक्षा भोगल्यावर सुचलं शहाणपण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi)  नुकताच चर्चेत आला आहे. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी बायकोला दुचाकीवर नेणे त्याला महागात पडले. विवेकने हेल्मेटविना बाईक चालवल्याने त्याला चलान भरावे लागले. विवेकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता. त्यानंतर त्याला चलान भरावे लागले. आता त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्हांला हसवेल.

हेल्मेट घालण्याचा दिला संदेश

विवेक ओबेरॉय यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओच्या शेवटी, 'नेहमी हेल्मेट घाला', तसेच एक संदेश दिला - अंडी फोडा, डोके नको. हा व्हिडिओ पोस्ट करताना विवेकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जर तुम्हाला डोक्याचे ऑम्लेट होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही राइडिंग करत असताना हेल्मेट नक्कीच घातले पाहीजे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

१४ फेब्रुवारीला भरावे लागले चलान

व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी, हेल्मेटशिवाय दुचाकी चालविण्याबद्दल विवेक ओबेरॉयचे चलान कापले गेले, त्यानंतर त्याने व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाला की, हा मी आहे आणि ही माझी दुचाकी आहे आणि आमची पावती कापली गेली आहे. या व्हिडीओमध्ये चलानच्या दंडाची प्रतही त्यांच्या हातात दिसली. आता विवेक ओबेरॉयने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो खूप मजेदार अंदाजमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये विवेक आपल्या जेवणाची वाट पाहत आहे, जेव्हा प्लेटमध्ये झाकलेले काहीतरी खाण्याचा विचार केला जात आहे, परंतु त्याला दिसते की, प्लेटमध्ये त्याच्यासाठी हेटमेट आले आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने असे लिहिले आहे की, 'जर तुम्हाला डोक्याचे ऑम्लेट होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही राइडिंग करत असताना नक्की घाला  हेल्मेट. 

Read More