Marathi News> मनोरंजन
Advertisement

WAR Movie Review : धमाकेदार ऍक्शन सीन्सचा तडका

सिनेमात अफलातून ऍक्शन 

WAR Movie Review : धमाकेदार ऍक्शन सीन्सचा तडका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा मच अवेटेड सिनेमा 'WAR' आज रिलीज झाला आहे. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दोन हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ एकत्र दिसणार आहे. या दोघांमध्ये एपिक वॉर आपल्याला 'वॉर' सिनेमातून पाहायला मिळणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'WAR'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला होता. या सिनेमाने अगदी सुरूवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये घर केलं होतं. नेटीझन्सची एक्सायटमेंड इतकी होती की, ट्रेलर रिलीज होताच हा व्हिडिओ टॉप ट्रेंडला होता. 

ट्रेलरमधूनच हा सिनेमा जबरदस्त ऍक्शनने भरला असल्याचं कळतंय. सिनेमात टायगर श्रॉफ हा हृतिक रोशनचा ज्युनिअर दाखवला आहे. सिनेमात टायगर हृतिकच्या शोधात असताना दिसत आहे. आणि तिथूनच सिनेमाची कथा सुरू होते आणि या दरम्यान दोघांमध्ये WAR पाहायला मिळतो. तसेच सिनेमात वीणा कपूर देखील ग्लॅमरस रुपात दिसत आहेत. सिनेमात दिग्दर्शकाने प्रेक्षकांना अपेक्षित ऍक्शन, थ्रिलर, रोमान्स असं सगळं काही परिपूर्ण दिलं आहे. प्री सेलची कमाई पाहता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'WAR' सिनेमा हिंदी सिनेमात एक नवा रेकॉर्ड रचेल असं वाटत आहे. 

'WAR' सिनेमाने रिलीज होण्याअगोदर ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. सिनेमा बुधवारी प्रदर्शित झाला पण अगोदरच्या शुक्रवारपासून याचं ऍडवांस बुकिंग सुरू झालं होतं. सर्वाधिक ऍडवान्स बुकिंग झालेला हा सिनेमा ठरला आहे. 

तसेच हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'WAR' सिनेमाने सर्वात जास्त प्री सेल कलेक्शन रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. प्री सेल कलेक्शनमध्ये 'WAR' सिनेमाने आतापर्यंत 31-32 करोड रुपयांपर्यंतची कमाई केली आहे.

Read More