Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : बॉलिवूड अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने स्विझरलँडमध्ये केलं असं प्रपोझ

पाहा हा व्हिडिओ 

VIDEO : बॉलिवूड अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने स्विझरलँडमध्ये केलं असं प्रपोझ

मुंबई : सध्या मुंबईत लग्नाचा सिझन सुरू आहे. एकापाठोपाठ सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. सोनम कपूर आणि नेहा धुपियाच्या पाठोपाठ आता दीपिकाच्या लग्नाची चर्चा आहे. पण या अगोदर दुसऱ्याच अभिनेत्रीने आपल्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्रीला तिच्या विदेशी बॉयफ्रेंडने हटके स्टाईलने प्रपोझ केलं आहे. आणि हा व्हिडिओ या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

या सस्पेंसवरू पर्दा उठला आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री कुणी दुसरी तिसरी नाही तर ही आहे ब्रूना अब्दुल्लाह. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. ब्रूना आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्विझरलँडला गेली आहे. हे दोघं मॅटरहॉर्नच्या सुंदर वातावरण रोमँटिक वेळ घालवत असताना बॉयफ्रेंडने एक गोड सरप्राईज दिलं आहे. यामुळे अभिनेत्री ब्रूनाच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. ब्रूनाच्या बॉयफ्रेंडने गु़डघ्यावर बसून अगदी फिल्मी अंदाजात प्रपोझ केलं आहे. हे बघून ब्रूनो इतकी भावूक झाली की तिचे अश्रू अनावर झाले.  

ब्रूनाच्या बॉयफ्रेंडच नाव एल असून गेल्या २ वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. ही भावना शेअर करताना तिने म्हटलं की, मी आपल्या राजकुमारासोबत लवकरच लग्न करणार आहे. तो मला राजकुमारीसारखं ट्रिट करतो. मला असं वाटतं की, मी जगातील सर्वात सुंदर मुलगी केलं आहे. हे सरप्राईज इतकं सुंदर आहे की, मी हा व्हिडिओ शेअऱ करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.ब्रूना अब्दुल्लाड मूळ रूपात ब्राझीलची राहणारी आहे. मुंबईत टूरिस्ट म्हणून आलेल्या या अभिनेत्रीला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. आणि त्यानंतर तिने भारतात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कॅश या सिनेमांत आयटम नंबर केलेला अतिशय लोकप्रिय झाला. तसेच ब्रूना 'देसी ब्वॉइज','आई', 'हेट लव्ह स्टोरीज' आणि 'ग्रँड मस्ती' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. 

Read More