Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!

Kiara Advani Sidharth Malhotra : कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला. 

Kiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!

Sidharth Malhotra-Kiara Advani Bold Photos: प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला. त्याचा एक व्हि़डीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Sidharth Malhotra) रोमँटिक अंदाजात स्विमिंग करताना दिसत आहे.

कियारा आडवाणी (Kiara Advani) सोशल मीडियावर सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी प्रत्येक क्षणाचा ती आनंद घेताना दिसते. त्याचबरोबर चाहत्यांसाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ (Viral Video) देखील शेअर करत असते. अशातच तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या लाखो चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.

कियाराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने लाल रंगाचे शॉर्ट्स आणि कियाराने काळ्या-पांढऱ्या रंगाची मोनोकिनी परिधान केल्याचं दिसतंय. उंचवट्याच्या काठावर उभी असताना कियारा आणि सिद्धार्थने समुद्रात उडी मारली. एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराने समुद्रात उडी मारली, ते पाहून सिद्धार्थ देखील क्लिन बोल्ड झाल्याचं दिसतंय. त्यावेळी, हॅप्पी बर्थडे टू मी... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी तुमची आभारी आहे, असं कॅप्शन कियाराने दिलं आहे.

पाहा Video

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

दरम्यान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत, मनीष मल्होत्रा, नेहा धूपिपा, शिल्पा शेट्टी, अथिया शेट्टी यांसह इतर कलाकारांनी देखील कियाराला तिच्या बर्थडेनिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा​हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. 7 फेब्रुवारी रोजी दोघंजण लग्नबंधनात अडकले होते.

अभिनेता वरुण तेजच्या 'घानी' चित्रपटासाठी कियाराला पहिली पसंती होती असं सांगितलं जातं. कियाराने ही ऑफर नाकारल्याने सई मांजरेकरने 'घानी' चित्रपटामध्ये कियाराला ऑफर करण्यात आलेली मायाची भूमिका साकारली होती. कियाराने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट स्वीकारला असता तर तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्राला ती फार आधीच भेटली असती. कियारा आणि सिद्धार्थ 'लस्ट स्टोरी'ची शुटींग पूर्ण झाल्यानंतरच्या एका पार्टीमध्ये 2018 साली पहिल्यांदा भेटले होते. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' 2012 ला म्हणजेच कियारा आणि सिद्धार्थ भेटण्याच्या 6 वर्ष आधी प्रदर्शित झाला होता.

Read More