Marathi News> मनोरंजन
Advertisement

आपल्या नवीन गाण्यासहीत यूट्यूबवर परतलीय 'ढिनचॅक पूजा'

जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा पूजा या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालीय

आपल्या नवीन गाण्यासहीत यूट्यूबवर परतलीय 'ढिनचॅक पूजा'

मुंबई : सोशल मीडियावर 'सेल्फी मैंने ले ली आज' म्हणत धुमाकूळ घालणारी ढिनचॅक पूजा परतलीय. ढिनचॅक पूजा अशी गायिका आहे जिनं हे सिद्ध केलंय की गायिका बनण्यासाठी तुम्हाला गाणं गाता यावं, असं काहीही नाही. किंवा सोशल मीडियावर हीट होण्यासाठी तुमच्या 'टॅलेंट'चं कौतुक व्हावं असंही नाही. ढिनचॅक पूजाचं 'सेल्फी मैंने ले ली आज'नं सोशल मीडियावर खूपच नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. नुकतंच पूजाचं नवं गाणं 'नाचे जब कुडी दिल्ली की' प्रदर्शित करण्यात आलंय. 

पूजाच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं २० जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलं. आत्तापर्यंत हे गाणं जवळपास १,८१,२१९ वेळा पाहिलं गेलंय. ढिनचॅक पूजा आपल्या विचित्र गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाणंदेखील लोकांना तसंच वाटण्याची शक्यता आहे. पूजाचं हे पंजाबी गाणं लोकांना आवडेल, असं तिलाही वाटतंय.

२०१७ मध्ये याच पद्धतीच्या प्रसिद्धीमुळे पूजा 'बिग बॉस'मध्येही दाखल झाली होती. आपल्या गाण्यांनी तिनं घरातल्या सदस्यांचंही चांगलंच मनोरंजन केलं. जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा पूजा या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर दाखल झालीय.

Read More