Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुप जलोटा यांना जसलीनकडून मिळालं ‘किस ऑफ लव्ह’

सुरुवातीपासून जलोटा आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी लहान असणाऱ्या जसलीनच्या नात्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या.

अनुप जलोटा यांना जसलीनकडून मिळालं ‘किस ऑफ लव्ह’

मुंबई: भजन सम्राट म्हणून लोकप्रियतेच्या शिखारावर पोहोचलेल्या अनुप जलोटा यांची वेगळीच बाजू ‘बिग बॉस’ या रिअलिटी शोमध्ये पाहायला मिळत आहे. या शोमध्ये ते पल्या तथाकथित प्रेयसीसोबत म्हणजेच जसलीन मथारु हिच्यासोबत आले आहेत.

‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात सुरुवातीपासून जलोटा आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी लहान असणाऱ्या जसलीनच्या नात्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या.

सोशल मीडियावर या कार्यक्रमाच्या काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्या आहेत. जे पाहता भजन सम्राटांचं त्यांच्या प्रेयसीशी असणारं नातं पाहून तुम्हालाही धक्काच बसेल.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जसलीन जलोटा यांना किस करताना दिसत आहे.

मी तुम्हाला आता काहीतरी देणार आहे, ज्यासाठी तुम्ही नाही म्हणायचंच नाही, असंच सांगत जसलीन त्या ठिकाणी येते आणि इतर स्पर्धकांसमोरच जलोटा यांना किस करते असं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

जसलीनकडून मिळालेलं हे सरप्राईज पाहता जलोटा यांच्या चेहऱ्यावरील भावही पाहण्याजोगे होते.

जलोटा आणि जसलीन यांचं हे नातं ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या घराचा त्यांच्या नात्यावर काही परिणाम होणार की, प्रेमाच्या बळावरच ही जोडी बिग बॉसचं जेतेपद मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Read More