Marathi News> मनोरंजन
Advertisement

Viral Video : लग्नाच्या दिवशी होणाऱ्या पत्नीकडून पतीसाठी खास भेट, पाहून तोसुद्धा झाला भावूक

व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, लग्न पहावे करुन.... 

Viral Video : लग्नाच्या दिवशी होणाऱ्या पत्नीकडून पतीसाठी खास भेट, पाहून तोसुद्धा झाला भावूक

नवी दिल्ली : जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर काही आठवणी कायम आपल्यासोबत असतात, हे आठवणींचं रांजण सातत्यानं भरत असतं. अशाच काही प्रसंगांपैकी एक म्हणजे लग्नाचा दिवस. इतरांच्या लग्नातील असंख्य आठवणी आपल्या लक्षात राहतातच. पण, स्वत:च्याच लग्नात मिळालेलं भन्नाट सरप्राईज मात्र कायमच लक्षात राहणारं आणि तितकंच खास असतं. 

सध्या याचीच अनुभूती झाली असावी एका तरुणाला. ज्याच्या होणाऱ्या पत्नीनं लग्नाच्याच दिवशी त्याला आश्चर्याचा धक्का दिला. 

सोशल मीडियाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळं त्याला मिळालेलं हे सरप्राईज अनेकांनाच पाहता आलं आहे. 

गुरुग्राम येथील सबा कपूर या तरुणीनं साधारण महिन्याभरापूर्वी तिच्या लग्नात जे काही केलं, त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. 

सहसा लग्नांमध्ये नवरीला तिचे भाऊ, एका सुरेख अशा फुलांच्या चादरीचं छत असणाऱ्या चौकटीतून आणतात. पण, इथे मात्र सबानं हटके एंट्री घेतली. 

लग्नात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना, भावंडांना आणि मित्रमंडळींना तिनं आपल्या तालावर नाचवलं आणि त्यांनीही यात सबाला साथ दिली. 

'सौ आसमानो को ...' या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर सबा टप्प्याटप्प्यानं एक एक पाऊल पुढे आली. 

पुढे येताना ती तिथं असणाऱ्या प्रत्येकासोबत नाचत होती. अखेरच्या टप्प्यात जेव्हा ती नवरदेवासमोर आली, तेव्हा तिनं प्रेमानं त्याला मिठी मारली. 

जिच्यावर प्रेम केलं तिचा हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरही खुप साऱ्या भावना आणून गेला. 

शेवटी तिनं कनवटीला लपवलेली अंगठी काढली आणि त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसत प्रपोज केलं. 

म्हणजे एखाद्या चित्रपटात शिट्ट्या मारण्याजोगा जो क्षण असतो, तसंच काहीसं हे चित्र. 

सबा आणि तिच्या होणाऱ्या पतीची केमिस्ट्री, त्याच्यासाठी तिनं मेहनतीनं केलेला हा परफॉ़र्मन्स पाहता, असं होणार असेल तर कोणीही प्रेमातही पडेल आणि लग्नही करेल नाही का...? 

Read More