Marathi News> मनोरंजन
Advertisement

अंडरगारमेंट जाहिरातीत Rashmika Mandanna ने असं काय केलं ज्यामुळे भडकले लोकं!

रश्मिका मंदानाला अंडरगारमेंट जाहिरातीत काम करणं पडलं महागात 

अंडरगारमेंट जाहिरातीत Rashmika Mandanna ने असं काय केलं ज्यामुळे भडकले लोकं!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेविश्वातील आणि नॉशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना यावेळी तिच्या कोणत्याही प्रोजेक्टबद्दल नाही तर अभिनेताम कौशलसोबतच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. ती विक्कीसोबत एका अंडरगारमेंटच्या जाहिरातीत दिसत आहे. जाहिरातीमध्ये तिने जे काही केलं आहे त्यामुळे तिचे चाहते प्रचंड निराश झाले आहेत. रश्मिकाच्या चाहत्यांनी तिच्यावर असणारी नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातूम व्यक्त केली आहे. रश्मिका तिच्या अंडरगारमेंट जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. 

काय आहे जाहिरातीमध्ये? 
जाहिरातीमध्ये रश्मिका योगा सेशन घेताना दिसत आहे. दरम्यान तिची नजर विकीच्या अंडरगारमेंटकडे जाते. रश्मिकाला अशा जाहिरातीत पाहिल्यामुळे तिच्यावर टीकांचा भडीमार सुरू आहे. सोशल मीडियावर रश्मिकाचे चाहते भडकले आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, 'रश्मिका मी तुझी जाहिरात पाहिली आहे. ते माझ्यासाठी फार निराशाजनक होतं.. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती...'

दरम्यान; विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त 'सरदरा उधम', 'सॅम बहादूर', 'मिस्टर लेले' आणि त्याचे इतर अनेक चित्रपट सध्या चर्चेत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा', 'मिशन मजनू' आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'अलविदा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

Read More