Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

Shreyas Talpade:  श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी नेमकं काय झालं?

हिंदुस्तान टाईम्सला एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रेयसने पूर्ण दिवस शूटिंग केली. त्यावेळी तो एकदम व्यवस्थित होता. यानंतर त्याने अॅक्शन सीनही शूट केला होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी गेला आणि पत्नीला सांगितलं अस्वस्थ वाटतंय. यानंतर पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. रूग्णालयात नेताना तो बेशुद्द पडला होता.”

श्रेयस तळपदेला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती आहे. गुरुवारी श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून प्रकृती स्थिर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला लवकरच डिस्चार्ज देणार आहे. 

'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचं शूटींग सुरु

श्रेयस तळपदे सध्या मुंबईमध्ये 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं करत होता. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, आर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीवर, राजपाल यादव, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, परेश रावल, तुषार कपूर ही या सिनेमाची स्टारकास्ट आहे. हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार असून याचं शूटिंग सध्या सुरु झालंय.

Read More