Marathi News> मनोरंजन
Advertisement

कमी झालेलं वजन अन् आत गेलेला गाल; वयाच्या 51 व्या वर्षी उर्मिला मातोंडकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना बसला धक्का!

 Urmila Matondkar Shocking Transformation: उर्मिला मातोंडकरनं शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष वेधलं. 

कमी झालेलं वजन अन् आत गेलेला गाल; वयाच्या 51 व्या वर्षी उर्मिला मातोंडकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना बसला धक्का!

 Urmila Matondkar Shocking Transformation: बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं 90 आणि 2000 चं दशक गाजवलं. त्यावेळी तिच्या सुंदरतेनं सगळ्यांचं मन जिंकलं. आता उर्मिला ही मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. सध्या उर्मिलाचे काही फोटो समोर आले आहेत हे फोटो पाहता ती ओळखू येत नाही आहे आणि प्रशंक विचार करत आहेत की असं काय झालं की तिची अशी ट्रान्सफॉर्मेशन झाली आहे. अचानक तिचं वजन कमी झालं असून तिचा चेहरा हा सुजल्यासारखा दिसतोय. अनेकांनी तिनं वजन कमी करण्याची सर्जरी केली की काय असा सवाल केला आहे. 

उर्मिला मातोंडकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिनं तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन शेअर केली आहे. तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये उर्मिलानं स्कर्ट सेट परिधान केला आहे. उर्मिलानं गुलाबी रंगाचा स्केटर स्कर्टसोबत बेबी पिंक रंगाचं जॅकेट स्टाईल केलं आहे. तर अचानक वयाच्या 51 व्या वर्षी उर्मिला इतकी बारीक झाली आहे. तिच्या फॅशन फॉरवर्ड लूकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पण या सगळ्यात तिचे ओठ मोठे दिसत आहेत. लोकांनी या सगळ्यावरून सोशल मीडियावर प्रश्न विचारले आहेत. 

उर्मिलानं फोटोसोबत कोणता कॅप्शन दिलेला नसून फक्त हार्टचं इमोजी शेअर केलं आहे. तर अनेक चाहत्यांनी उर्मिलात झालेले बदल पाहता लगेच सवाल केला आहे. चाहत्यांनी सांगितलं की 'कशा प्रकारे ती ओळखू येत नाही आहे आणि तिचे फेशियल फिचर्स देखील वेगळे दिसत आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिनं तिच्या चेहऱ्याचं काय केलंय?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'एकतर तिनं सर्जरी केली आहे किंवा 10 जीबी एआय काम आहे. हे नसेलतर 10 किलो ओजम्पिक आहे. कृत्रिम अर्थात प्लास्टिक दिसण्याच्या विचारात आणखी एक सुंदर चेहरा गमावला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ही तर चारू असोपासारखी दिसते. सर्जरी चुकीची झाली. काही लोकांनी हे देखील म्हटलं की, खरंच ही उर्मिला आहे का? ही तिचं रंगीला गर्ल आहे का? अरे नाही, ही तिचं आहे तिनं तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे.'  आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आता काही दिवसांपूर्वीच ती किती सुंदर दिसत होती. या स्त्रींयाना काय झालं आहे त्या काय करताय?'

हेही वाचा : तुम्ही जर भुताला घाबरत नसाल तर 'या' सीरिज नक्कीच पाहा

दरम्यान, उर्मिलाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर उर्मिला ही 'रंगीला', 'जुदाई', 'सत्या', 'छोटा चेतन', 'कौन', 'खूबसूरत', 'प्यार तूने क्या किया' आणि 'भूत' सारख्या चित्रपटांचा भाग झाली होती. तिचा अखेरचा चित्रपट हा 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर तिनं 2018 मध्ये ब्लॅकमेल गाण्यावर परफॉर्म केलं. 2022 मध्ये ती डान्स रिअॅलिटी शो 'डीआईडी सुपर मॉम्स' मध्ये परिक्षक म्हणून दिसली होती. 

Read More