Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिनाला सोडून अमृतासोबत काय करतोय सैफ?

घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी अमृता आणि सैफ आले एकत्र... कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण   

करिनाला सोडून अमृतासोबत काय करतोय सैफ?

मुंबई :  एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगच्या रिलेशनशिपच्या चर्चा  होत्या. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता सैफ आणि अमृताने लग्न केल. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकू शकल नाही. 1991 साली सैफ आणि अमृताने लग्न केल आणि 13 वर्षांनंतर म्हणजे 2004 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर कायमचे वेगळे झालेले सैफ आणि अमृता अनेक वर्षांनंतर एकत्र आले. 

लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र आणणारी अभिनेत्री सारा अली खान होती. सैफ आणि सारातं नातं तुटलं होतं, दु:ख दोघांच्याही मनात होतं, त्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून योग्य अंतर ठेवलं होतं. पण अनेक वर्षांनी अमृता आणि सैफची भेट झाली 

साराने जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा केवळ अमृताच नाही तर सैफही चांगल्या वडिलांचे कर्तव्य पार पाडत तिला सोडवण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात गेला होता.

आपल्यासाठी अनेक वर्षांनंतर आई-वडील एकत्र आले... तो दिवस सारासाठी कधीही विसरता येणार नाही. एका मुलाखतीत साराने ही आठवण चाहत्यांनी सांगितली. 

fallbacks

साराने सांगितले होते की, त्या दिवशी तिघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर अमृता आणि सैफ आपल्या मुलीला हॉस्टेलमध्ये सेटल करण्यासाठी गेले. जिथे अमृताने सारासाठी बेड बनवलं, तर वडील सैफने आभ्यासासाठी टेबल तयार केला.  

या आठवणी साराच्या मनात आजही जिवंत आहेत. साराला सोडून आल्यानंतर दोघे कधीही भेटले नाहीत. साराबद्दल सांगायचं झालं, तर ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Read More