Marathi News> मनोरंजन
Advertisement

6 दिवसांत 132 कोटी कमावणाऱ्या 'सैयारा'चा अर्थ काय? जाणून घ्या नेमका अर्थ

सध्या चर्चेत असलेला 'सैयारा' चित्रपट सगळेजण पाहत आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, 'सैयारा' या शब्दाचा अर्थ काय आहे? तर जाणून घेऊयात त्याचा खरा अर्थ. 

6 दिवसांत 132 कोटी कमावणाऱ्या 'सैयारा'चा अर्थ काय? जाणून घ्या नेमका अर्थ

Saiyaara Meaning: यशराज फिल्म्स निर्मिती असलेला अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पद्डा यांचा 'सैयारा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत आहे. अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने 132 कोटींचा आकडा गाठला असून, येत्या आठवड्यात 150 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे.

मोहित सूरी दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. विशेषतः तरुणांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटातील मुख्य जोडी अहान आणि अनितच्या केमिस्ट्रीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्सपासून ते ट्विटर ट्रेंडपर्यंत 'सैयारा' सर्वत्र चर्चेत आहे.

चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यातील शीर्षक गीताने तर रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळवले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. समीक्षकांनीही चित्रपटाच्या कथानकाला आणि भावनिक मांडणीला चांगले स्टार दिले आहेत.

'सैयारा' शब्दाचा अर्थ
'सैयारा' हा शब्द उर्दू आणि अरबी भाषेतून आला आहे. उर्दूमध्ये याचा अर्थ आकाशात भ्रमण करणारा तारा किंवा ग्रह असा होतो. तर अरबी भाषेत याचा अर्थ हालचाल करणारी किंवा सतत फिरती असलेली व्यक्ती असा घेतला जातो. प्रेमात एकटेपणाने वावरणाऱ्या व्यक्तीसाठी देखील हा शब्द वापरला जातो, ज्यातून त्याच्या भावनिक गहिरेपणाचा अंदाज येतो.

हे शीर्षक का निवडले गेले?
यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांनी या चित्रपटाच्या प्रेमकथेतील उत्कटता आणि तळमळ दाखवण्यासाठी 'सैयारा' हे शीर्षक निवडले. या नावात एक काव्यात्म भाव आहे जो प्रेमाला ताऱ्यासारखी तेजस्विता देतो.

ट्रेलरमधील एका दृश्यात, अनित पद्डा अहान पांडेला सांगते - 'सैयारा म्हणजे ताऱ्यांमध्ये एकटा तारा, जो स्वतःच्या प्रकाशाने जग उजळवतो. तू माझा सैयारा आहेस.' हा संवाद चित्रपटातील मुख्य प्रेमकथेचा गाभा सांगून जातो.

हे ही वाचा: 'दात न घासता आला अभिनेता', इंटिमेट सीनदरम्यान विद्याचा अनुभव; अभिनेत्री म्हणाली...

चित्रपटाच्या स्पर्धेतही ठरला अव्वल
18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अनुपम खेरच्या 'तन्वी द ग्रेट' आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'निकिता रॉय' यांच्याशी स्पर्धा करावी लागली. मात्र, उत्कृष्ट कथानक, दमदार संगीत आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे 'सैयारा'ने पहिल्याच आठवड्यात स्पर्धक चित्रपटांना मागे टाकले.

प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि बॉक्स ऑफिसवर गाजणारा हा चित्रपट पुढील काही आठवडेही आपले वर्चस्व टिकवेल, अशी चित्रपट प्रेक्षकांची आशा आहे.

Read More