Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री सयानी गुप्ताचं टक्कल करण्यामागचं कारण काय?

सयानी गुप्ताने तिच्या केसांना निरोप दिला आहे.

अभिनेत्री सयानी गुप्ताचं टक्कल करण्यामागचं कारण काय?

मुंबई : असं म्हणतात की, स्त्रियांचे सैंदर्य हे त्यांच्या केसांमुळे अधिक फुलूण दिसते. त्यामुळे प्रत्येक स्त्री केस कापताना हजार वेळा विचार करते. पण सैंदर्याचा विचार न करता बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताने तिच्या केसांना निरोप दिला आहे. म्हणजे तिने चक्क टक्कल केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण घाबरण्याचे काही कारण नाही. 

सयानीच्या आगामी भूमिकेचा हा भाग असल्यामुळे तिला हे पाऊल उचलावे लागले आहे. तिने टक्कल केले नसून मेकअपच्या मदतीने तिने टक्कल केल्याचे दाखवण्यात आले आहे. सयानीने खुद्द तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेकअपचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. 

सयानी तिच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. २०१२ मध्ये तिने 'सेकेंड मॅरीज डॉट कॉम' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतू 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'  चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

याशिवाय तिने 'जग्गा जासूस', 'फुकरे रिटर्न्स', 'जॉली एलएलबी' यांसारख्या एकापेक्षा एक चित्रपटात भूमिका साकारल्या. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल १५' चित्रपटात भूमिका साकारली आहे. सध्या ती 'शेमलेस' या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.      

Read More