Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुला जमत नाही, तर सांगता येत नव्हतं का?', अक्षय खन्ना सेटवर सर्वांसमोर विद्या बालनवर ओरडला, ती म्हणाली 'मी घाबरुन...'

सलाम-ए-इश्कच्या सेटवर कशाप्रकारे अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आपण त्याच्यासोबतच्या एका चित्रपटाला नकार दिल्याने कशाप्रकारे ओरडत होता याबद्दल सांगितलं आहे.   

'तुला जमत नाही, तर सांगता येत नव्हतं का?', अक्षय खन्ना सेटवर सर्वांसमोर विद्या बालनवर ओरडला, ती म्हणाली 'मी घाबरुन...'

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सलाम-ए-इश्कच्या सेटवर अभिनेत्री विद्या बालनवर संतापला होता. विद्या बालनने (Vidya Balan) स्वत:च हा खुलासा केला आहे. यावेळी जॉन अब्राहमने तिची सुटका केली होती. विद्या बालनने नुकतीच Bollywood Hungama Style Icons Summit ला हजेरी लावली. यादरम्यान तिने सेटवर नेमकं काय घडलं होतं याबद्दल सांगितलं. विद्या बालनने अक्षय खन्ना, जॉन अब्राहम यांच्यासह सलाम-ए-इश्क चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासह सलमान, प्रियांका, अनिल कपूर, गोविंदा, जुही चावला अशी अभिनेत्यांची फौजच होती. 

अक्षय खन्नासोबतचा चित्रपट नाकारला असल्याने जेव्हा तो समोर आला, तेव्हा आपण कशाप्रकारे जॉन अब्राहमची मदत मागितली याबद्दल विद्या बालनने सांगितलं आहे. सोबत चित्रपट नाकारला असल्याने विद्या बालनला अक्षय खन्नासमोर जाताना भीती वाटत होती. तिने सांगितलं की, "मला अक्षय खन्नासोबत एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. काही कारणास्तव मला ती स्क्रिप्ट आवडली नव्हती. पण मी फोन उचलून सांगण्याची हिंमत केली नाही. मी माझ्या मॅनेजरला फोन करुन दिग्दर्शकाला निरोप देण्यास सांगितलं".

पुढे तिने सांगितलं की, "यानंतर मी सलाम-ए-इश्कच्या सेटवर अक्षय खन्नाला भेटले. त्यावेळी त्याने मला सुनावलं. तो म्हणाला, तुला जर चित्रपट करायचा नव्हता तर मला का सांगितलं नाहीस? त्यानंतर मी जॉन अब्राहमकडे गेले आणि म्हटलं 'कृपया मला वाचवशील का?' कारण मी तेव्हा नवीन होते. मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मला कोणालाही दुखवायचं नव्हतं किंवा वाईट वाटावं असं वाटत नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की, तो माझी मस्करी करत होता".

सलाम-ए-इश्क चित्रपटाचं दिग्दर्शन निखील अडवाणीने केलं होतं. चित्रपटात सहा प्रेमकथांचं मिश्रण दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाबद्दल बोलायचं गेल्यास विद्या बालन 'भूल भूलैय्या 3' चित्रपटात अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासह कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी होती.

Read More