Chiranjeevi : दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी हे गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी फक्त दाक्षिणात्य चित्रपटात नाही तर बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत आणि संपूर्ण देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. पण त्यांची इतकी फॅन फॉलोइंग असतानाही त्यांना 1989 मध्ये नॅशनल अवॉर्ड सेरिमनीसाछी नवी दिल्लीत आले होते. आता त्या गोष्टीला 36 वर्ष झाली असली तरी देखील त्यांच्या मनात तो अपमान आजही आहे.
चिरंजीवी यांनी सांगितलं की अवॉर्ड्स सेरिमनीमध्ये दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टी तिथे असताना सगळ्यांसमोर त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आला. त्यामुळे त्यांना अपमानास्पद वाटलं. त्यांनी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'आचार्य' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमा दरम्यान, याविषयी सांगितलं होतं.
चिरंजीवी यांनी सांगितलं की त्यांच्या 'रुद्रवीणा' या चित्रपटाला राष्ट्रीय एकतेसाठी बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना नरगिस दत्त यांच्या हातानं प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की दिल्ली सरकारचे लोकं हे हिंदी चित्रपटसृष्टीला भारतीय सिनेमा म्हणून पाहतात. तर चिरंजीवी यांना वाटलं की अशा प्रकारे त्यांनी देशातील इतर फिल्मी इंडस्ट्रीचा अपमान केला आहे.
चिरंजीवी यांनी सांगितलं की 1989 मध्ये त्यांनी नॅशनल फिल्म अवॉर्ड्स सेरिमनीतून पहिलं सरकारनं एक चहा समारंभ ठेवला होता त्यासाठी त्यांना बोलावलं होतं. तिथे एका भिंतीवर त्यांनी पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज कलाकारांची नावं पाहिली. त्यांच्या योगदानाचा तिथे उत्सव करण्यात आला. तर शिवाजी गणेशन आणि राज कुमार सारखे दिग्गज कलाकार तिथे दिसलेच नाही. चिरंजीवी यांनी पुढे सांगितलं की "मी विचार करत होतो की त्या भिंतीवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला घेऊन काहीच नाही. पण तिथे फक्त जयललितासोबत एमजीआर यांचा एक फोटो होता आणि प्रेम नजीर यांचा एक फोटो. त्यांनी त्याला दाक्षिणात्य चित्रपटांचं नाव दिलं. फक्त इतकंच. त्यांनी राज कुमार, विष्णुवर्धन, एनटी रामाराव किंवा नागेश्वर राव, शिवाजी गणेशन तर त्याशिवाय आमच्या इंडस्ट्रीतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांना देखील तिथे जागा दिली नव्हती. मला त्यावेळी अपमानास्पद वाटलं. हे अपमानास्पद होतं. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला भारतीय चित्रपट म्हणून दाखवलं. तर इतर चित्रपट 'प्रादेशिक चित्रपट' म्हणून दाखवले गेले आणि त्यांचा आदर केला गेला नाही."
हेही वाचा : 'त्याच्या' खांद्यावर डोकं अन् चेहऱ्यावर गोड हसू; समांथाचा Cute Photo पाहून चाहत्यांनाही आनंद
चिरंजीवी यांनी ही गोष्ट पुन्हा एकदा 2024 मध्ये राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तेव्हा चिरंजीवी यांनी सांगितलं की "भिंतीवर फक्त दिलीप कुमार सारख्या कलाकारांचे फोटो होते. तर दाक्षिणात्य कलाकार दिसलेच नाही. कन्नड सुपरस्टार राजकुमार आणि तमिळ लेजेंड एमजीआर यांचे देखील फोटो नव्हते. तर चिरंजीवी यांना गर्व आहे की एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटानंतर चित्र बदलू लागलं आणि इतर चित्रपटसृष्टी फक्त प्रादेशिक चित्रपटांपर्यंत राहिल्या नाही.''