Marathi News> मनोरंजन
Advertisement

लादेनच्या घरात सापडलेल्या 'या' भारतीय गायिकेच्या कॅसेट; ती म्हणाली, 'ओसामा कसाही असला तरी...'

Osama bin Laden Home Indian Singer Song Recordings: अमेरिकेतील वर्ल्ड ड्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या ओसामाचा अमेरिकेने 2011 साली खात्मा केला तेव्हा त्याच्या घरातील वस्तू सील कमांडोंनी ताब्यात घेतलेल्या.

लादेनच्या घरात सापडलेल्या 'या' भारतीय गायिकेच्या कॅसेट; ती म्हणाली, 'ओसामा कसाही असला तरी...'

Indian Singer Song Recordings At Osama bin Laden Home: 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्यानंतर पाकिस्तान खवळला असून मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सीमेवर हल्ले करतोय. भारत हे हल्ले परतवून लावत असतानाच आता जुन्या नव्या युद्धासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील नावाजलेलं नाव असलेल्या अलका याज्ञी आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या ओसामा बीन लादेनसंदर्भातील असाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे. 

जगातील सर्वात खतरनाक दहशतवादीही चाहता

भारतीय सिनेमाचा आत्मा हा संगीत आहे, असं म्हणतात. भारतीय चित्रपटांमधून गाणी वजा केल्यास चित्रपट फारच निरस होतील असं म्हणतात. गाण्यांच्या माध्यमातून मानवी भावनांना हात घालणं सहज शक्य होतं. अनेक गाण्यांचे शब्द असे असतात की चित्रपट लक्षात राहिला नाही तरी ती गाणी अजरामर होतात. गाणं अजरामर होण्यासाठी शब्दांबरोबर आवाजही तसाच असावा लागतो. असाच एक आवाज म्हणजे प्रसिद्ध गायिका अलका याज्ञी यांचा आहे. मागील अनेक दशकांपासून अलका याज्ञी यांनी आपल्या सुमधूर आवाजाने भारत आणि पाकिस्तानमधील लाखो चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. अलका याज्ञी यांनी गायलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्यांपैकी आहेत. अलका याज्ञींनी लोकप्रियता केवळ सर्वसामान्यांमध्ये नाही तर अनेक सेलिब्रिटीही त्यांचे चाहते आहेत. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की जगातील सर्वात खतरनाक दहशतवादीही अलका याज्ञींच्या आवाजाच्या प्रेमात होता.

नेमकं काय सापडलं लादेनच्या घरात?

अनेक बातम्यांनुसार, 2011 मध्ये अमेरिकी नेव्ही सील कमांडोंनी ओसामा बीन लादेन राहत असलेल्या पाकिस्तानमधील अटोकाबाद इथल्या घरावर हल्ला केला. त्यावेळी त्यांना लादेनच्या घरामध्ये अनेक बॉलिवूड गाण्यांच्या कॅसेट मिळाल्या. यावरुनच ओसामा बीन लादेन हा अलका याज्ञी यांचा चाहता होता हे स्पष्ट होत आहे. बरं ही गोष्ट अलका याज्ञी यांना 2017 मध्ये एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला तेव्हा समजली.

'लादेन जो काही असेल...'

सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण दले दहशतवाद्यांना घरात घुसून मारत आहे, असं म्हटलं जात असतानाच ओसामाच्या घरात सापडलेल्या अलका याज्ञी यांच्या गाण्याच्या कॅसेट्सची सोशल मीडियावरही पुन्हा नव्याने चर्चा होत आहे. लादेनच्या घरात आपल्या गाण्यांच्या कॅसेट सापडल्यासंदर्भात अलका याज्ञी यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. "हा माझा दोष आहे का?" असा प्रश्न अलका याज्ञी यांनी ओसामाच्या घरात तुमच्या गाण्यांच्या कॅसेट सापडल्या असा प्रश्न विचारला असता आश्चर्यचकित होऊन विचारला. "ओसामा बीन लादेन जो काही आहे, जसा काही आहे त्यांच्या आतही कुठेतरी एक छोटासा कलाकार असेल. त्याला गाणी आवडत असतील तर चांगलं आहे ना?" असं अलका याज्ञी यांनी म्हटलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jarp Media (@jarpmedia)

किती खतरनाक चाहते

अलका याज्ञी यांनी दिलेल्या उत्तरावरुन त्यांचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अनेकांनी अलका याज्ञींनी या प्रश्नावर संयमी उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. एकाने मजेदार कमेंट करताना, "अलका याज्ञी आता माझे चाहते किती खतरनाक आहेत, असं म्हणू शकतात," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Read More