Marathi News> मनोरंजन
Advertisement

परफेक्शनिस्ट आमिरची वाईट सवय, सांगतेय पत्नी किरण

तुम्हाला बसेल धक्का 

परफेक्शनिस्ट आमिरची वाईट सवय, सांगतेय पत्नी किरण

मुंबई : आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव 7 नोव्हेबंर रोजी आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. किरण जेव्हा 14 वर्षांची होती तेव्हापासून तिला आमीर खानवर क्रश होतं. आमीर खानच्या कयामत से कयामत तक या सिनेमापासून ती त्याच्या प्रेमात पडली. 

आमीर आणि किरणची पहिली ओळख लगानच्या सेटवर झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री होत गेली आणि मग ह्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लगानच्या शुटिंगनंतर जवळपास 2 वर्षांनी आमीर खानने पहिली पत्नी रीना दत्तसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर आमीर खान खूप कठीण काळातून जात होता. आणि याचवेळी किरण आणि आमीर खूप जवळ आले. त्यानंतर त्यांनी 2005 मध्ये लग्न केलं. 

आमीर खान कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये आला होता. तेव्हा त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामुळे बहुदा मिस्टर परफेक्शनिस्टच्या वाईट सवयी तुमच्यासमोर येणार आहेत. आणि तुम्हाला धक्का बसणार आहे. 

आमीरने सांगितलं की, आमीर दररोज त्याची पत्नी किरण रावसोबत शावर घेतो. तसेच रॅपिड फायर राऊंडमध्ये आमीरने सांगितलं की, त्याच्या बेडवरील सवयींना तो स्वतःला 10 पैकी 5 गुण देईल. तर किरण म्हणाली की, ती आमीर खानला 10 पैकी 20 गुण देईल. 

तसेच किरणने आमीरच्या खाण्या - पिण्याच्या सवयी सांगितल्या. तेव्हा आमीर म्हणाला की, जेव्हा मी डाएट करतो तेव्हा मी काहीच खात नाही. पण जेव्हा मी खातो तेव्हा माझं स्वतःवर कंट्रोल नसतो. 

Read More