Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा नोरा समुद्र किनारा स्वच्छ करते

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

जेव्हा नोरा समुद्र किनारा स्वच्छ करते

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या नृत्य अदांनी तर चाहत्यांना घायाळ केले आहे. सध्या नोराच्या 'साकी साकी' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. त्याचप्रमाणे 'पछताओगे' हे गाणं सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. नोराच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ तर होत आहे. परंतू आता सध्या ती तिच्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 

समुद्र किनारी ती स्वच्छता करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. शनिवार आणि रविवारी ती समूद्र किनारा स्वच्छ करताना कॅमेऱ्यात कैद झली आहे. मुंबईच्या माहीम बिचवर नोरा सफाई करत होती. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

नुकतंच, नोरा फतेही आणि विकी कौशल ही जोडी रोमॅन्टिक 'पछतायोगे...' या म्युजिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

नोरा फतेही आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. विकी कौशल सध्या करण जौहरच्या आगामी 'भूत' आणि 'तख्त' चित्रपटांसाठी काम करत आहे. तसंच विकी आगामी 'उधम सिंह' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More