Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या कॅमेऱ्यासमोर किसचा सीन का देत नाही, यावर अभिषेकचं कडक उत्तर

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायच्या गालावर किस करत खूप आकर्शित उत्तर दिलं.

ऐश्वर्या कॅमेऱ्यासमोर किसचा सीन का देत नाही, यावर अभिषेकचं कडक उत्तर

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे.  जेव्हा 'ओपरा विनफ्रे'ने ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर कॅमेरासमोर किसिंग सीन न करण्याबाबत एक प्रश्न विचारला तेव्हा अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायच्या गालावर किस करत खूप आकर्शित उत्तर दिलं.

२००९मध्ये लग्नानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन पहिल्यांदा 'ओपरा विनफ्रे' शोमध्ये दिसले. 'ओपरा विनफ्रे' मध्ये ऐश्वर्या रायला तिच्या फिल्मी करिअर आणि रिलेशनशिपबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले होते. तिच्या या मुलाखतीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मुलाखतीदरम्यान अशी एक वेळ होती जेव्हा ऐश्वर्याला प्रश्न विचारले जात होते तेव्हा अभिषेक त्या प्रश्नांची उत्तर देताना दिसला

अभिषेक बच्चनने प्रश्नांची उत्तरं इतकी सुंदर दिली होती, की प्रत्येकालाच त्याचे एक एक शब्द आवडू लागले. ऐश्वर्याला 'ओपरा विनफ्रे' शोमध्ये विचारलं की, बॉलिवूडमध्ये तुझं चमकदार करिअर असूनही तू किसींग सीन का केले नाहीस. यावर अभिषेक बच्चन हसला आणि ऐश्वर्याच्या गालावर किस करुन म्हणाला की असे सीन वेस्टर्न सिनेमांमध्ये बर्‍याचदा खुलेआम दाखवले जातात

आपल्या भारतात असे सीन नाही होत. अभिषेक म्हणाला की, जेव्हा आम्ही कोणतेही सीन करतो तेव्हा ते सीन तरुण मुलं मुलींना पाहतात. ते प्रेम करतात, प्रेम व्यक्त करण्यासाठी ते किस करतात.तो म्हणाला की, भारतात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एक गाणं आहे, ज्यामध्ये प्रेमाच्या सगळ्या भावना आहेत. त्यात बऱ्याच प्रेमाचे ईमोशन आहेत. पुढे अभिषेक म्हणाला की, प्रेक्षकांनाही हे सर्व पडद्यावर दाखवण्याची गरज वाटत नाही. असं मला वाटतं''.

ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी 'गुरु' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली आणि 20 एप्रिल 2007 रोजी त्यांचं लग्न झालं. सध्या अभिषेक 'दसवी' आणि 'बॉब विश्वास'सारख्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तर ऐश्वर्या राय लवकरच मणिरत्नमसोबत एका सिनेमात दिसणार आहे.

Read More