Alia Bhatt - Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघं आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. ते दोघं अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकमेकांवर असलेल्या प्रेमाविषयी बोलताना दिसतात. इतकंच नाही त्यांची लव्ह स्टोरी देखील एका फिल्मी स्टोरी प्रमाणेच आहे. रिलेशनशिपमध्ये येण्या आधी अनेकदा ते कोणत्या कोणत्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यावेळी त्यांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं. असाच काही 2014 मध्ये झालं होतं. 2014 मध्ये आलियाचा चित्रपट 'हायवे' हा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी रणबीरनं आलियाची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत रणबीरनं आलियाला प्रेम आणि करिअर अशा सगळ्या गोष्टींविषयी प्रश्न विचारले होते.
दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यासोबत आलियानं 'हायवे' हा चित्रपट बनवला होता. त्यावेळी प्रमोशन दरम्यान, रणबीर देखील सहभागी झाला होता. यावेळी रणबीरनं आलियाची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत रणबीरनं आलियाला तिच्या आयुष्याशी संबंधीत प्रश्न देखील विचारले. रणबीरनं आलियाला विचारलं की 'प्रेमाविषयी तुझा विचार काय आहे? कारण तू अशा अभिनेत्रींपैकी एक आहेस जी विचार करते की माझं करिअर सगळ्यात महत्त्वाचं आहे.' रणबीरच्या या प्रश्नावर आलिया उत्तर देत म्हणाली की 'ती असं कधीच म्हणाली नाही.'
पुढे रणबीरनं आलियाला विचारलं की 'आलिया त्या मुलाशी लग्न करेल का जो तिला लग्नानंतर अभिनय करायचा नाही असं सांगेल?' तर यावर उत्तर देत आलिया म्हणाली 'नाही, शक्यता ही आहे की मी संपूर्ण आयुष्य अभिनय करू शकणार नाही. पण जिकता वेळ मी अभिनय करू शकते तितका वेळ मी अभिनय करेन. तुला आयुष्यात जी मुलगी हवी आहे ती मी नाही ती दुसरी कोणी आहे. तर माफ कर.'
हेही वाचा : हृतिक रोशननं Ex पत्नी सुझैनसाठी केलेली ती पोस्ट पाहताच नेटकरी का म्हणाले Divorce Goal?
रणबीर आणि आलिया या दोघांनी सगळ्यात आधी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात काम केलं होतं. त्या चित्रपटा दरम्यान, त्यांना एकमेकांवर प्रेम झालं आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. मग 2022 मध्ये त्या दोघांनी घरच्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आणि त्याच वर्षी राहाचा जन्म झाला.